Wednesday, October 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूज"प्रिय अजित भाई..."; गौतम गंभीरची अजित आगरकरांसाठी भावनिक पोस्ट

“प्रिय अजित भाई…”; गौतम गंभीरची अजित आगरकरांसाठी भावनिक पोस्ट

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू अजित आगरकर याचा निवड समिती अध्यक्ष म्हणून कार्यकाळ ४ ऑक्टोबरला संपला. आगरकरने त्याच्या कार्यकाळात अनेक धाडसी निर्णय घेतले आणि त्यासाठी त्याला टीकांचा सामना करावा लागला. अजित आगरकरच्या कार्यकाळात भारताने तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आणि त्याच्यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने बुधवारी भावनिक पोस्ट लिहिली.

“प्रिय अजित भाई, तुझ्यासोबत काम करणे हा सन्मान
“गौतम गंभीर यांनी आपल्या संदेशात लिहिले, “प्रिय अजित भाई, तुझ्यासोबत काम करणे हा माझ्यासाठी अत्यंत मोठा सन्मान होता. त्या तीन आयसीसी ट्रॉफी तुमच्या त्या विश्वासाची साक्ष देतात, ज्यात संघ नेहमी प्रथम आणि सर्वोच्च स्थानी राहिला. मला खात्रीने सांगावेसे वाटते की, इतिहास तुझ्याशी अधिक दयाळूपणे वागेल. प्रत्येक गोष्टीसाठी मनापासून धन्यवाद आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.”

Dear Ajit Bhai, an absolute honour to work with you. Those 3 ICC trophies are testimony of your conviction: Team first & Team ahead, always.. I must say, History will be kinder to you. Thank you for everything. My heartfelt wishes for your future endeavours !! https://t.co/gYQN0fea8X— Gautam Gambhir (@GautamGambhir) October 7, 2026

- Advertisement -

अजित आगरकरने जुलै २०२३ मध्ये भारतीय संघाच्या निवड समिती प्रमुखाची जबाबदारी हाती घेतली. पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करत त्याने बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने निवड केली होती. त्याच्या कार्यकाळात भारतीय संघाने जागतिक क्रिकेटमध्ये वर्चस्व सिद्ध केले. भारताने २०२४ मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकून भारताचा ११ वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला आणि २००७ नंतर पहिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला.

आगरकरच्या कार्यकाळात भारतीय संघाने संक्रमणाचा काळ अनुभवला. रोहित शर्मा, विराट कोहली व रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तून निवृत्ती घेतली. आगरकर भारतीय संघाच्या भविष्याच्या वाटचालीच्या दृष्टीने विचार करत होता आणि त्यामुळेच रोहित व विराट यांनी कसोटीतूनही निवृत्ती जाहीर केली. त्याने युवा खेळाडूंना सातत्याने संधी देताना युवा फळी तयार करण्यावर भर दिला.

गंभीर आणि आगरकर या जोडीने भारतीय क्रिकेटला आक्रमक आणि ‘संघाला पहिले प्राधान्य’ देणारी नवी दिशा दिली. आता आगरकरच्या कार्यकाळानंतर या यशस्वी अध्यायाची सांगता झाली असून, गंभीर याच्या संदेशाने आगरकरांच्या निःस्वार्थ योगदानावर अधिकृत मोहर उमटवली आहे.

ताज्या बातम्या

आंदोलन

‘आंदोलन सोडा, अभ्यासाला लागा!’ MPSC विद्यार्थ्यांना हायकोर्टाचा सल्ला; सरकारला महत्त्वाचे निर्देश

0
पुणे | Puneमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराविरोधात पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता न्यायालयीन वळण मिळाले आहे. आंदोलनामुळे वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होत असलेल्या...