अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
अनंत चतुर्दशीच्या (Anant Chaturthi) दिवशी पाईपलाइन रस्त्यावर मृत्युंजय युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला (Gautami Patil Programme) पोलिसांनी परवानगी नाकारली (Police Denied Permission) आहे. यशोदानगर येथे विहिरीत विसर्जन मिरवणुकीने गणेश मंडळे व नागरिक घरगुती गणेशाचे विसर्जन करतात. तसेच, गौतमी पाटील (Gautami Patil) यांच्या कार्यक्रमामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तोफखाना पोलिसांनी (Topkhana Police) कार्यक्रमाला परवानगी नाकारून प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंद नाकाडे (रा. गुलमोहर रोड) व उपाध्यक्ष आकिब शेख (रा. गुलमोहर रोड) यांना सीआरपीसी 149 प्रमाणे नोटीस बजावली आहे.
शालेय विद्यार्थीनीने नदीपात्रात उडी घेतली, पुढे झाले असे काही…
28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 ते 10 या वेळेत यशोदानगर येथे विसर्जन कार्यक्रम निमित्त नृत्य कलाकर गौतमी पाटील यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) परवानगीची मागणी करण्यात आली होती. पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारून मृत्युंजय प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांना नोटीस (Notice) बजावली आहे. यापूर्वी नगर शहरात तसेच तालुक्यात गौतमी पाटील यांचा कार्यक्रम झाल्यावर त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.
सासरे व सुनबाईत रंगली ‘जुगलबंदी’ !
त्यामुळे गणेश विसर्जनदिनी यशोदानगर येथे कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमला किंवा गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाला परवानगी देण्यात येणार नाही. या उपरही त्या ठिकाणी काही कार्यक्रम केल्यास किंवा गौतमी पाटील (Gautami Patil) यांचा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केल्यास, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण झाल्यास प्रतिष्ठानच्या कार्यकर्ते, पदाधिकार्यांसह नृत्य कलाकर गौतमी पाटील (Gautami Patil) यांच्याविरूध्द कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
व्यावसायिकाची 45 लाखांची फसवणूक