Tuesday, September 29, 2026
Homeक्राईमCrime News : गावठी कट्टा व जिवंत काडतूसासह एकजण जेरबंद

Crime News : गावठी कट्टा व जिवंत काडतूसासह एकजण जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

एमआयडीसी परिसरात गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूसासह एक संशयित इसम स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतला आहे. 31 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी अवैध अग्निशस्त्रे बाळगणार्‍या इसमांविरोधात कारवाईचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत.

- Advertisement -

त्यानुसार, पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव गुट्टे, शरद घोडके, बिरप्पा करमल, भिमराज खर्से, राहुल डोके, योगेश कर्डिले, सतिष भवर, चालक उमाकांत गावडे व अरुण मोरे यांचे पथक तयार करण्यात आले. 8 डिसेंबरला हे पथक एमआयडीसी परिसरामध्ये तपास करत असताना, दिपक साळवे (वय 31, रा. शिंगवे नाईक) हा नगर-मनमाड रोडलगत एमआयडीसी पोलीस स्टेशन चौकाजवळील साई पान टपरीजवळ अंधारात विनापरवाना अग्निशस्त्रासह थांबलेला असल्याची माहिती मिळाली.

पथकाने तत्काळ छापा टाकत संशयिताचा शोध घेतला. शिताफीने त्याला ताब्यात घेतल्यानंतर दोन पंचांच्या उपस्थितीत झडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस असा एकूण 31 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...