Monday, September 28, 2026
Homeक्राईमShrirampur : वाकडी रोडवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

Shrirampur : वाकडी रोडवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

वाकडी-श्रीरामपूर रोडवर स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या नियोजनबद्ध कारवाईत गावठी कट्टा (अग्निशस्त्र) बाळगून त्याची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या चार संशयितांना ताब्यात घेतले. आरोपींकडून एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे, तीन मोबाईल, रोख रक्कम तसेच इरटीगा चारचाकीसह एकूण 5 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्रधारकांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस अंमलदार फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड, शामसुंदर जाधव, रमिजराजा आतार, भगवान थोरात, प्रशांत राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली. दि. 6 जुलै रोजी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, गुप्त बातमीदारामार्फत वाकडी-श्रीरामपूर रोडने इरटीगा कारमधून काही जण गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार यशवंत बाबा चौकी, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात सापळा रचण्यात आला.

संशयित इरटीगा (एमएच-48-एके-7763) वाहन थांबवून झडती घेतली असता, चालकासह चार जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची नावे सागर दत्तू उपळकर (28), विशाल रामकिसन गुंजाळ (26), ऋतिक भगवान गुंजाळ (25) आणि पवन गोरख उपळकर (27) (सर्व रा. रामपूर, ता. श्रीरामपूर) अशी आहेत. झडतीदरम्यान आरोपींकडून 40 हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे, तीन मोबाईल, रोख रक्कम आणि सुमारे 5 लाख रुपये किमतीची इरटीगा कार असा एकूण 5.95 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्राथमिक चौकशीत जप्त करण्यात आलेले अग्निशस्त्र मध्यप्रदेशातून खरेदी करून विक्रीसाठी आणल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार रमीजराजा रफीक आत्तार यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आर्म्स अ‍ॅक्ट कलम 3, 7 व 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...