Monday, June 22, 2026
HomeनगरShrirampur : गावठी कट्ट्यासह सराईत आरोपी जेरबंद

Shrirampur : गावठी कट्ट्यासह सराईत आरोपी जेरबंद

15.42 लाखांचा मुद्देमाल जप्त

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने (LCB Police) मोठी कारवाई करत श्रीरामपूर येथील हरेगाव (Haregaon) रोडवरील एस कॉर्नर परिसरातून गावठी कट्टा (Gavathi Katta) बाळगणार्‍या एका सराईत आरोपीला अटक (Accused Arrested) केली. आरोपीकडून गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे (Cartridges), मोबाईल आणि स्कॉर्पिओ वाहनासह एकूण 15 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन (SP Mummaka Sudarshan) यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली अवैध शस्त्रे बाळगणार्‍या व्यक्तींविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोये, पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे व त्यांच्या पथकाने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माहिती संकलन सुरू असताना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती प्राप्त झाली.

हरेगाव फाटा (Haregaon Phata) परिसरात काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून एक व्यक्ती गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयाजवळील एस कॉर्नर रोड परिसरात सापळा रचला. दरम्यान, हरेगावकडून श्रीरामपूरकडे (Shrirampur) येणारी विनानंबर स्कॉर्पिओ संशयास्पदरीत्या आढळून आली. पोलिसांनी वाहन अडवून चालकाला ताब्यात घेतले.

चौकशीत त्याची ओळख अविनाश धनराज माकोने (वय 27, रा. निफाड, जि. नाशिक) अशी पटली. तपासादरम्यान आरोपीविरुद्ध यापूर्वी अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यात विविध प्रकारचे एकूण नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली. झडतीदरम्यान आरोपीच्या ताब्यातून 30 हजार रुपये किमतीचे गावठी पिस्टल, दोन हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे, 10 हजार रुपयांचा मोबाईल आणि 15 लाख रुपयांची स्कॉर्पिओ असा एकूण 15.42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात आला.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल रमीजराजा रफीक आत्तार यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात (Shrirampur City Police Station) गुन्हा रजिस्टर क्रमांक 599/2026 अन्वये शस्त्र अधिनियम कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे करीत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. अवैध शस्त्रांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे सांगितले.

ताज्या बातम्या

धक्कादायक ! जिवंत माणसाचा दफनविधी; राहुरी तालुक्यात खळबळ

0
हनुमंतगाव |वार्ताहर| Hanumantgaon राहुरी (Rahuri) तालुक्यातील सोनगाव येथे घडलेल्या एका अभूतपूर्व घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हरवलेल्या मतिमंद शब्बीर जमादार मन्सूरी याला मृत (Death)...