Saturday, July 27, 2024
Homeनगरगावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगणार्‍यास अटक

गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगणार्‍यास अटक

नेवासा |प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील (Newasa) शनीशिंगणापूर (Shanishinganapur) येथून गावठी कट्टा (Gavathi Katta) व जिवंत काडतूस (Live Cartridge) बाळगणार्‍या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक (Accused LCB Arrested) केली.

- Advertisement -

याबाबत सायबर पोलीस ठाण्याचे प्रभाकर भिंगारदे यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 17 सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, विजय भारशंकर रा. बर्‍हाणपूर ता. नेवासा हा शनीशिंगणापूर (Shanishinganapur) येथील हॉटेल वैष्णवी समोरील बानकर पार्किंग येथे विनापरवाना गावठी कट्टा (Gavathi Katta) बाळगून विक्री करण्याकरीता येणार असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार मनोहर गोसावी, पोलीस नाईक रविंद्र कर्डिले, पोलीस नाईक संदीप दरंदले, पोलीस नाईक संतोष लोढे, पोलीस नाईक गणेश भिंगारदे, संतोष खैरे यांचे पथक पाठविले. पथकाने सापळा लावून संशयीत इसमास ताब्यात घेतले.

गणेशोत्सवानंतर जिल्ह्यातील 195 ग्रा.पं.च्या निवडणुकीचा बार?

त्याने त्याचे नाव विजय विलास भारशंकर (वय 26) वर्षे, रा. बर्‍हाणपूर ता. नेवासा असे असल्याचे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 30 हजार रुपये किमतीचा एक गावठी बनावटीचा कट्टा व 500 रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस मिळून आले. याबाबत त्यांचेकडे बारकाईने विचारपूस करता त्याने गावठी कट्टा (Gavathi Katta) व जिवंत काडतूस (Live Cartridge) विक्री करण्याचे उद्देशाने घेवून जात आहे अशी कबुली दिली. त्याच्याकडून वरील प्रमाणे 30 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबत शिंगणापूर पोलीस ठाण्यात (Shanishinganapur Police Station) गुन्हा रजिस्टर नंबर 178/2023 आर्म अ‍ॅक्ट 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अ विजय विलास भारशंकर हा सराईत गुन्हेगार असून त्यांचे विरुध्द शनीशिंगणापूर पोलीस ठाण्यात 2021 मध्ये खुनाच्या प्रयत्नाचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल (Filed a Case) आहे.

बबनराव घोलप यांचे शक्तीप्रदर्शनअल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार

- Advertisment -

ताज्या बातम्या