Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमशाहरूख गावठी कट्टयासह जेरबंद

शाहरूख गावठी कट्टयासह जेरबंद

बेलापूरहून टिळकनगरला जाताना पोलिसांची कारवाई

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

येथील उड्डाणपुलावर गोळीबार करणारा कुख्यात गुन्हेगार शाहरूख शेख स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले. त्याच्याकडून एक गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे हस्तगत केली. जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या आदेशन्वे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात व पोलीस अंमलदार गणेश लोंढे, फुरकान शेख, बाळासाहेब खेडकर, सागर ससाणे, अमोल कोतकर, अमृत आढाव, प्रशांत राठोड व महादेव भांड यांचे पथक तयार करून श्रीरामपूर येथील अवैध धंद्यांची माहिती घेऊन कारवाई करण्यासाठी त्यांना सूचना दिल्या.

- Advertisement -

9 फेब्रुवारी रोजी तपास पथक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी माहिती घेत असताना, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शाहरूख रज्जाक शेख (रा.निमगाव खैरी, ता.श्रीरामपूर) हा फॉर्चुनर गाडी (क्र. एम-04-एफ-4771) मधुन बेलापूर येथून टिळकनगर येथे गावठी कट्टासह येणार आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाली. पथक पंचासमक्ष मिळालेल्या माहितीवरून बेलापूर ते टिळकनगर जाणार्‍या रोडवर, कुर्‍हे वस्तीजवळ सापळा लावून थांबलेले असताना, त्यांना फॉर्च्युनर गाडी येताना दिसली. पोलिसांनी गाडी थांबवून गाडीतील इसमास ताब्यात घेऊन, त्याचे नाव विचारले असता त्याने शाहरूख रज्जाक शेख (वय 32, रा.निमगाव खैरी) असे असल्याचे सांगितले.

पथकाने त्याच्या ताब्यातून 54 हजार रुपये किंमतीचे एक गावठी पिस्तुल, 4 जिवंत काडतुसे जप्त केले. तसेच 10 लाख रुपये किंमतीची ग्रे रंगाची टोयोटा कंपनीची फॉर्च्युनर व 20 हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल असा एकुण 10 लाख 74 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. पथकाने गावठी पिस्तुल कोठून आणले याबाबत विचारपूस केली असता, त्याने काहीएक माहिती सांगितली नाही. आरोपीस विश्वासात घेऊन त्याने आणखी कोठे गुन्हे केले आहेत, याबाबत विचारपूस केली असता, त्याने मागील दोन ते तीन महिन्यापूर्वी श्रीरामपूर येथील अशोकनगरकडे जाणार्‍या उड्डाणपुलावर एका इसमावर गावठी कट्टातून फायर केला असल्याची माहिती सांगितली. याप्रकरणी त्याच्याविरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक़्ट कायदा कलम 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यांचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस हे करत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...