Thursday, July 9, 2026
Homeक्राईमCrime News : गावठी कट्ट्यासह नेवासा तालुक्यातील तरूणाला पकडले

Crime News : गावठी कट्ट्यासह नेवासा तालुक्यातील तरूणाला पकडले

राहुरीच्या तरूणाकडून घेतला कट्टा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नेवासा तालुक्यात गावठी कट्टा बाळगणार्‍या एका तरूणाविरूध्द स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त केली. सतीष विश्वनाथ कसबे (वय 30, रा. मोरेचिंचोरे, ता. नेवासा) असे त्या तरूणाचे नाव असून त्याने सदरचा कट्टा अमोल रावसाहेब विटनोर (रा. मांजरी, ता. राहुरी) याच्याकडून आणला असल्याची कबूली दिली आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे बाळगणार्‍या व्यक्तींवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून नेवासा तालुक्यात माहिती संकलन व कारवाई सुरू करण्यात आली होती. बुधवारी (4 मार्च) हे पथक सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध शस्त्रे बाळगणार्‍यांची माहिती घेत असताना माहिती मिळाली की, सतीष कसबे हा गावठी कट्टा कमरेला लावून मोरेचिंचोरे गावाच्या शिवारातील ओढ्याजवळ फिरत आहे.

या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून संबंधित सतीष कसबे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कमरेला एक गावठी कट्टा तसेच दोन जिवंत काडतुसे आढळून आली. चौकशीदरम्यान त्याने सदरचा कट्टा अमोल विटनोर याच्याकडून आणल्याची माहिती दिली असून तो सध्या पसार आहे. या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपनिरीक्षक समीर अभंग तसेच पोलीस अंमलदार हृदय घोडके, सोमनाथ झांबरे, भीमराव खर्से, शाम जाधव, प्रशांत राठोड, मनोज साखरे व योगेश कर्डिले यांच्या पथकाने केली.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरा धरण 65 टक्के भरले; निळवंडेत ‘एवढा’ पाणीसाठा

0
अतिवृष्टीमुळे भातरोपे, बांधांचे प्रचंड नुकसान, पंचनाम्याची मागणी भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara उत्तर नगर जिल्ह्याची भाग्यरेखा असलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात पुनर्वसु नक्षत्रांच्या सरींचे तांडव केल्याने धरणात वेगाने नवीन...