Friday, February 6, 2026
Homeक्राईमसराईत गुन्हेगार गावठी कट्ट्यासह धनगरवाडी शिवारात पकडला

सराईत गुन्हेगार गावठी कट्ट्यासह धनगरवाडी शिवारात पकडला

एमआयडीसी पोलिसांची कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी|Ahilyanagar

सराईत गुन्हेगाराच्या ताब्यातून एमआयडीसी पोलिसांनी एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस जप्त केले आहे. नीलेश बाबासाहेब ससाणे (वय 23 रा. सिध्दार्थनगर, अहिल्यानगर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

रविवारी (17 नोव्हेंबर) दुपारी नगर तालुक्यातील धनगरवाडी शिवारात पोलिसांनी ही कारवाई केली. धनगरवाडी शिवारात हनुमान मंदीर परिसरात एक इसम बेकायदेशीरपणे एक गावठी कट्टा, काडतुस बाळगून असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना रविवारी दुपारी मिळाली होती. त्यांनी एक पथक तयार करून सदर कारवाईकामी रवाना केले. या पथकाने धनगरवाडी शिवारात सापळा लावून संशयित इसम नीलेश बाबासाहेब ससाणे याला पकडले. त्याच्या ताब्यातून एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस असा 25 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

YouTube video player

त्याच्याविरूध्द तोफखाना व एमआयडीसी पोलीस ठाण्यात गंभीर मारहाण, आर्म अ‍ॅक्ट कलमानुसार दोन गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. सहायक निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव व देविदास भालेराव, अंमलदार राजु सुद्रिक, किशोर जाधव, भगवान वंजारी, सुरेश सानप यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : फळप्रक्रिया उद्योगासाठी राहुरीच्या कृषी विद्यापीठाची 1 हजार 500 एकर...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar फळ प्रक्रिया उद्योगासाठी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडील 1 हजार 500 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. हा उद्योग जिल्ह्यातील फळ उत्पादकांसाठी...