Tuesday, September 29, 2026
Homeक्राईमCrime News : गावठी कट्ट्यासह राहाता तालुक्यातील तरूणाला पकडले

Crime News : गावठी कट्ट्यासह राहाता तालुक्यातील तरूणाला पकडले

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील जुना वडगाव गुप्ता रस्त्यावरील जाधव मळा परिसरात तोफखाना पोलिसांनी सापळा रचून राहाता तालुक्यातील एका तरूणाला बेकायदेशीर गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसासह रंगेहाथ पकडले. कुणाल विलास जगताप (वय 25, रा. निमगाव, ता. राहाता) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांना एक तरूण संशयास्पदरित्या शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी त्यांनी तातडीने गुन्हे शोध पथकाला कारवाईचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी यांच्या पथकाने डॉन बॉस्कोकडे जाणार्‍या रस्त्यावर सापळा रचून कारवाई केली व जगताप याला पकडले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...