Friday, May 24, 2024
Homeनगरकंबरेला गावठी कट्टा खोसून मार्केटयार्डमध्ये दहशत

कंबरेला गावठी कट्टा खोसून मार्केटयार्डमध्ये दहशत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कंबरेला गावठी कट्टा खोसून मार्केटयार्ड परिसरात गांजा ओढणार्‍या तरुणाला कोतवाली पोलिसांनी पकडले. जॉन कासिनो परेरा (वय 34 रा. चंदे बेकरीजवळ, बंगाली चौकी) असे पकडलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे, चिलीम असा 15 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisement -

पोलीस अंमलदार कैलास शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परेराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी दुपारी एक वाजता पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, संदीप थोरात, सुजय हिवाळे, अमोल गाढे, कैलास शिरसाठ यांच्या पथकाची होळी सणानिमित्त हद्दीत गस्त सुरू होती. दुपारी निरीक्षक यादव यांना माहिती मिळाली, एक इसम कंबरेला शस्त्र लावून मार्केटयार्डमध्ये फिरत आहे. तो सध्या मार्केटयार्डमधील सार्वजनिक स्वच्छतागृहाच्यामागे गांजा पित आहे, यानंतर कारवाई करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या