Saturday, June 15, 2024
Homeनगरगावठाण जागेबाबत बकुपिंपळगाव ग्रामस्थांचे उपोषण आश्वासनानंतर मागे

गावठाण जागेबाबत बकुपिंपळगाव ग्रामस्थांचे उपोषण आश्वासनानंतर मागे

देवगडफाटा |वार्ताहर| Devgad Phata

- Advertisement -

नेवासा तालुक्यातील बकुपिपळगाव येथील रहिवाशांनी गावठाण जागेसंदर्भात ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण सरपंच व ग्रामसेवकांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.

गावठाण जागेची स्मशानभूमी व खेळाचे मैदान, जनावरे उभी राहण्याची जागा, खळे वाडगे इत्यादी जागेची चौकशी करून गावठाण हद्द कायम करा या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू होते. ग्रामपंचायतीच्या लेखी आश्वासनानंतर 1 नोव्हेंबर रोजी नायब तहसीलदार, सरपंच व ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत लेखी आश्वासननंतर मागे घेतले.

ग्रामपंचायतने लेखी पत्रात म्हटले की,सदर जागेचा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करणार असून यासाठी लागणारे लेआऊट बाबत 60 दिवसाच्या कालावधीत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन सरपंच व ग्रामसेवक यांनी दिले. 60 दिवसांत हे काम मार्गी लावू, असे आश्वासन सरपंच व ग्रामसेवक यांनी दिले.

याप्रसंगी नायब तहसीलदार श्री.चिंतामणी, सरपंच सुनीता बापू लांडगे, तलाठी श्री.गाडेकर, ग्रामसेवक श्री.घुगरे, माजी सरपंच खंडूभाऊ थोरात, पोपट जाबुळकर, भाऊ माळी, एकनाथ मोरे, विजय दळवी, करीम शेख, रामनाथ माडगे, गणपत माळी, सूर्यभान धोत्रे, पुंडलिक पवार, भाऊसाहेब माळी, हरिभाऊ दुकळे, बाबासाहेब चव्हाण, रोहिदास मोरे, कल्याण जाभलकर, राजेंद्र जर्‍हाड, भाऊसाहेब दळवी, संजय हंडाळ, विलास पवार, दशरथ जाबुळकर, बंटी बर्डे, जगन्नाथ अधगळे, विक्रम जाभळकर, पाराजी जाबुळकर, बाबासाहेब पातारे, भीमराज जाभळकर, शाम अवसरमल, विष्णू दळवी, रुद्रा जाभळकर आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या