Sunday, May 26, 2024
Homeनगरगावठी दारू अड्ड्यावर छापा

गावठी दारू अड्ड्यावर छापा

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

अवैध हातभट्टी दारू अड्ड्यांवर कर्जत पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी शिवारात ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी शिबिर उर्फ कोक्या संभा काळे तसेच संजय आकाश काळे यांच्या हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाई करून दारू तयार करण्याचे साहित्य नष्ट केले.

- Advertisement -

त्याच्यावर दारूबंदी अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी वाखारे व पोलीस निरीक्षक अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, मनोज मुरकुटे, गुंड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या