Tuesday, July 14, 2026
Homeदेश विदेशपोलिस आणि आयबी माझ्यावर…; सोनम वांगचुक यांच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयात केले गंभीर...

पोलिस आणि आयबी माझ्यावर…; सोनम वांगचुक यांच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयात केले गंभीर आरोप

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
लडाखचे पर्यावरवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक हे सध्या जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहेत. सोनम वांगचुक यांच्या पत्नी गितांजली वांगचुक यांनी सर्वोच्च न्यायालयात बोलताना आयबीवर गंभीर आरोप केले आहे. त्या म्हणाल्या की, पोलीस आणि आयबीचे लोक त्यांचा पाठलाग करतात.

गितांजली वांगचुक काय म्हणाल्या?
राजस्थान पोलीस आणि आयबीचे अधिकारी माझ्यावर नजर ठेवून आहेत. माझा पाठलाग करत आहेत. मी जेव्हा माझे पती सोनम वांगचुक यांना भेटायला जाते तेव्हा दिल्लीला परत येईपर्यंत पोलीस माझ्यासह असतात. मला प्रत्येक गोष्ट त्यांच्या निगराणीखालीच करावी लागते, असे गीतांजली यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर सर्वोच्च न्यायालयात गीतांजली यांनी एक प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यामध्येच त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे.

- Advertisement -

त्या पुढे म्हणाल्या, मी ७ आणि ११ ऑक्टोबरला जोधपूर येथे असलेल्या मध्यवर्ती तुरुंगात सोनम वांगचुक यांना भेटायला गेले होते. त्यावेळी जोधपूरच्या विमानतळावर उतरताच मला पोलिसांच्या कारमध्ये बसवण्यात आले. त्यानंतर मी तुरुंगापर्यंत पोहचेपर्यंत पोलीस माझ्या बरोबरच होते. मला सोनम वांगचुक यांना भेटायचे असेल किंवा बाहेर कुठेही जायचे असेल तर आधी पोलिसांना सूचित करावे लागते असाही आरोप त्यांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे.

गीतांजली यांनी प्रतिज्ञापत्रात असाही आरोप केला आहे की जोधपूरला त्यांना इतर कुणालाही भेटू दिले जात नाही किंवा दुसरीकडे कुठेही जाऊ दिले जात नाही. मी एकदा ट्रेनने आले होते, ट्रेन सुटायला भरपूर वेळ होता त्यावेळी मला पोलिसांनी रेल्वे स्टेशनवर बसवून ठेवले. पोलीस अधिकारीही माझ्यासह बसून राहिले होते. ३० सप्टेंबरला जेव्हा मी पत्रकार परिषद घेतली त्यानंतर माझ्या घराजवळ पोलीस निगराणी ठेवू लागले. मी जेव्हा बाहेर पडते तेव्हा काहीजण माझा बाईक किंवा कारने पाठलाग करतात असाही आरोप गीतांजली यांनी केला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik News : ​ सावळघाटात भीषण अपघात; चार जण ठार, एक...

0
पेठ | प्रतिनिधी Peth नाशिक-पेठ रस्त्यावरील सावळघाटात आज सायंकाळी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. पेठ-दिंडोरी हद्दीलगत एका भरधाव ट्रकचे ब्रेक फेल...