Tuesday, November 19, 2024
HomeUncategorizedलेझर व बीम लाईट वापरल्यास जेल!

लेझर व बीम लाईट वापरल्यास जेल!

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात (Airport area) असलेली मंगल कार्यालये तसेच विवाह सोहळ्यात लेझर व बीम लाईटच्या प्रकाशाने विमान उड्डाण आणि लॅण्डिंग करण्यास अडथळे येत आहेत. त्यामुळे या परिसरातील विवाह सोहळा, सामाजिक उपक्रमांत वापरण्यात येणाऱ्या लेझर, बीम लाईट्सवर बंदी घालण्याचे आदेश पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिले आहेत.

- Advertisement -

शहरात गेल्या काही दिवसांपासून विमान उड्डाण, लॅण्डिंग करण्यास लेझर, बीम लाईट्समुळे अडथळा होत असल्याची तक्लार विमान पायलटने विमान प्राधिकरणाकडे केली होती. या परिसरातून लेझर, बीम लाईट्सचा सर्रास वापर केला जात असून त्यामळे विमान लॅण्डिंग करण्यास व विमान उड्डाण करताना पायलटचे लक्ष विचलित होत आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते. ही बाब प्राधिकरणाच्या लक्षात विमान पायलटने आणून दिली आहे. परिणामी हा त्रास कमी करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे म्हटले होते.

दरम्यान, औरंगाबाद विमानतळ परिसरात फार्म हाऊस, मंगल कार्यालय, सामाजिक सभागृह आदी परिसरातून लेझर, बीम लाईट्स कायमचे बंद करण्यासाठी पोलीस आयुक्‍त मनोज लोहिया यांनी एमआयडीसी सिडको, मुकुंदवाडी, सातारा आणि पुंडलीकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व सामाजिक सभागृह तसेच मंगल कार्यालयांना नोटीस दिली असून लेझर, बीम लाईट्सचा वापर टाळावा, असे आदेशित केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचे संकेत दिले आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या