Saturday, May 4, 2024
Homeनाशिकजिल्हा परिषदेची आज सर्वसाधारण सभा

जिल्हा परिषदेची आज सर्वसाधारण सभा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ( General meeting of Zilla Parishad ) बुधवारी (दि.८) अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर (ZP President Balasaheb Kshirsagar ) यांच्या अध्यक्षतेखाली बोलाविण्यात आली आहे. कोविडचे (covid ) नियम पाळून ही सभा घेतली जाणार आहे.

- Advertisement -

यासाठी प्रशासनाकडून सभागृहात गर्दी नियंत्रणासाठी नियोजन केले जात आहे. सदस्यांची संख्या कमी करता येणार नसल्याने, प्रशासनातील अनावश्यक अधिकारी व सेवकांची सभागृहातील संख्या नियंत्रित करण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

यासंदर्भात अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यात सोमवारी (दि.६) अध्यक्ष दालनात चर्चा झाली. करोनाच्या पार्श्वभूमीवर दीड वर्षांपासून सभा सभागृहात न घेता आॅनलाई पध्दतीने घेतल्या जात होत्या.

मात्र, पदाधिकाºयांसह सदस्यांचा कालावधी अंतिम टप्यात आल्याने, सदस्यांनी सभागृहात ऑफ लाईन सभा घेण्याचा आग्रह धरला. त्यानुसार अध्यक्ष क्षीरसागर यांनी सर्वसाधारण सभा सभागृहात आयोजीत करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

सभागृहात सभा घेण्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. सभागृहात प्रत्यक्ष सभा होणार असली तरी, गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. कोविडचे सर्व नियम पाळून ही सभा घेण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. त्यासाठी सभागृहात गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे.

दीड वर्षानंतर सभा सभागृहात होत असल्याने बहुतेक सर्व सदस्य उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रशासनाने अधिकारी व इतर सेवकांची गर्दी होणार नाही,यासाठी नियोजन केले आहे. सभागृहात अधिकाºयांसोबत त्या-त्या विभागातील अनेक अधिकारी,सेवक उपस्थित असतात. याशिवाय कामकाजाच्यादृष्टीने अनेक शिपाई देखील उपस्थित असतात. त्यामुळे ही गर्दी कमी करण्याच्यादृष्टीने प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहे.

समिती सदस्य पदासाठी निवडणूक

स्थायी समितीसह इतर समित्यांच्या सदस्य निवडीची प्रक्रिया सर्वसाधारण सभेपूर्वी होणार आहे.ही निवड प्रक्रिया सकाळी नऊ वाजेपासून सुरू होणार असून नऊ ते दहा या वेळेत सदस्य पदासाठी अर्ज दाखल करता येईल. त्यानंतर माघारी व सकाळी ११ वाजेला ही निवडणूक प्रक्रिया सुरू होईल,असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. स्थायी समितीची एक जागा रिक्त असून या जागेवर आपली नियुक्ती व्हावी,यासाठी शिवसेना,राष्ट्रवादी,भाजपाचे सदस्य गेल्या आठ दिवसांपासून तयारीला लागलेले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या