Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजVideo: "महायुतीमधून अजित पवारांना बाहेर काढा"; भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली खदखद

Video: “महायुतीमधून अजित पवारांना बाहेर काढा”; भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली खदखद

पुणे | Pune
अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा, अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको… पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार आमच्या बोकांडी बसवले आहे, असे म्हणत भाजपच्या कार्यकर्त्यांनी खदखद व्यक्त केली आहे. भाजप आमदार राहुल कुल यांच्यासमोरच भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी खदखद बोलून दाखवली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

काय म्हणाले सुदर्शन चौधरी
“खरचं कार्यकर्ते काय सांगतत याचा विचार करणार असाल तर अजित दादांना महायुतीमधून बाहेर काढा. त्यांनी सुभाषबापू, योगेश अण्णा, राहुल दादांवर अन्याय केला. हे तिघेच्या तिघे नेते मंत्री झाले असते. अनेक लोकांना महामंडळ मिळाले असते, असे सुदर्शन चौधरी म्हणाले. तसेच ज्यांना आम्ही १० वर्ष विरोध केला, तीच राष्ट्रवादी तुम्ही आमच्या बोकांडी बसवली. अशी सत्ता आम्हाला नको,” अशी खदखदही चौधरी यांनी मांडली.

- Advertisement -
महायुतीमधून अजित पवारांना बाहेर काढा; भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली खदखद

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राज्यात एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण स्थापन करण्याचे निर्देश

0
मुंबई । प्रतिनिधी Mumbai राज्यातील विविध महानगरात वेगवेगळ्या परिवहन सेवा कार्यरत आहेत. या सर्व सेवा एकाच छताखाली आणल्या जाणार असून त्यासाठी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण...