Friday, May 31, 2024
HomeUncategorizedकिमान तीन दिवसाआड पाणी मिळावे!

किमान तीन दिवसाआड पाणी मिळावे!

औरंगाबाद Aurangabad

शहराचा पाणी पुरवठा सुरळीत (Smooth water supply) करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. शहराला तीन दिवसाआड (Three days apart) पाणी पुरवठा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने (Order High Court) दिले आहेत. त्यानुसार मनपाने उपाययोजनांवर काम सुरू केले असून पाण्याची उपलब्धता, (Availability of water) साठवण क्षमता, पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक यासर्वांची तपासणी व पडताळणी करून खात्री पटल्यानंतरच त्याबद्दल निर्णय घेतला जाईल, असे महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी (Municipal Commissioner Dr. Abhijeet Chaudhary) यांनी सांगितले.

- Advertisement -

स्मार्ट सिटी कार्यालयात महापालिका प्रशासक तथा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की. शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हर्सूल जलशुद्धीकरण केंद्र ते दिल्लीगेटपर्यंत पाईपलाईनचे काम पूर्ण करुन हर्सूल तलावातून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.

त्यासोबतच व्हॉल्व्ह दुरुस्ती व बदलणे, फारोळा जलशुद्धीकरण केंद्राची वाळू बदलणे, व्हॉल्व्ह नव्याने बसविणे, पाईपलाईनची दुरुस्ती, नवीन पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू करणे, गळती शोधणे, अनधिकृत नळ कनेक्शन तोडणे ही कामे हाती घेण्यात आली आहेत. सध्या चार दिवसाआड पाणी परवठा केला जात आहे.

उच्च न्यायालयाने देखील तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. समितीच्या बैठकीत पाणी पुरवठ्याचा वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यासाठी अधिकाऱ्यांना पाणी पुरवठा वेळापत्रकाची तपासणी आणि पडताळणी करून अहवाल देण्याची सूचना केली आहे.

त्यानुसार पडताळणी केली जात आहे. त्याबद्दलची खात्री पटल्यानंतरच तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल. कधी सुरू करता येईल याबद्दल निश्‍चित सांगता येणार नसल्याचे आयक्त डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या