Sunday, February 16, 2025
Homeनगर19 तोळे सोने,14 तोळे चांदी व रोख रक्कम चोरून चोरट्यांचा पोबारा

19 तोळे सोने,14 तोळे चांदी व रोख रक्कम चोरून चोरट्यांचा पोबारा

घारगाव |वार्ताहर| Ghargav

संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव गावांतर्गत असलेल्या कान्होरे मळा येथील विकास नानाभाऊ कोरडे यांच्या बंद घराचा पत्रा तोडून चोरट्यांनी घरातील 19 तोळे सोन्याचे दागिने, 14 तोळे चांदी व रोख रक्कम तीस हजार रूपये चोरून असा एकून सहा लाख 69 हजार रूपयांचा ऐवज चोरून पोबारा केला आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली असून रविवार (22 मे) सकाळी उघडकीस आली आहे. तर या जबरी घरफोडीने कान्होरेमळ्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

याबाबत घारगाव पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, घारगाव गावांतर्गत असलेल्या कान्होरे मळा येथे विकास कोरडे हे आपल्या कुटुंबासोबत राहात आहे. त्यांच्या पत्नीचे व काही त्यांचे 19 तोळे सोन्याचे दागिने, 14 तोळे चांदी व रोख रक्कम तीस हजार रूपये हा सर्व ऐवज त्यांनी घरात ठेवला होता आणि ते शनिवारी आळेफाटा ता.जुन्नर जि. पुणे याठिकाणी गेले होते. रविवारी सकाळी पुन्हा ते साडेदहा वाजेच्या दरम्यान कान्होरे मळा येथे आले त्यानंतर त्यांनी घर उघडले असता तर समोर घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. त्यामुळे कोरडे घाबरून गेले होते तर घरात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कमही नव्हती. त्यामुळे आपल्या घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यानंतर त्यांनी घटनेची माहिती घारगाव पोलीसांना दिली माहिती समजताच पोलीस नाईक राजेंद्र लांघे, प्रमोद चव्हाण यांच्यासहआदी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अनेक गावांमध्ये मोठ्याप्रमाणात घरफोड्या झाल्या आहेत. मात्र या चोर्‍यांचा शोध लावण्यात घारगाव पोलीस अपयशी ठरले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी नव्याने होणार्‍या बदल्यांमध्ये घारगाव पोलीस स्टेशनला कार्यक्षम पोलीस निरीक्षक द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या