Wednesday, May 22, 2024
Homeनाशिककळसुबाई शिखरावर नवरात्रीनिमित्त कळसुबाई गिर्यारोहकांकडुन घटस्थापना

कळसुबाई शिखरावर नवरात्रीनिमित्त कळसुबाई गिर्यारोहकांकडुन घटस्थापना

इगतपुरी । प्रतिनिधी

सर्वोच्च शिखरस्वामीनी कळसुबाई मातेच्या चरणी तसेच शिवकालीन गडकिल्ल्यांच्या सेवेशी निःस्वार्थ रुजू असलेले घोटी शहरातील कळसुबाई मित्र मंडळाचे गिर्यारोहकांकडून घटस्थापना करण्यात आली.

- Advertisement -

गेल्या २७ वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्वोच्च असलेल्या शिखरस्वामिनी कळसुबाई शिखरावर अखंडितपणे नवरात्रीत घटस्थापना करून विजया दशमी पर्यंत रोज नऊ दिवस उपवास करून शिखरावर चढाई करीत शिखर स्वामिणी कळसुबाई मातेची मनोभावे आरती करतात. तसेच मंदिराच्या परिसरातील निर्माल्याची स्वच्छता करतात.

यावेळी मंडळाच्या गिर्यारोहकांच्या २७ वर्षांच्या कार्याची दखल घेत प्रसिध्द असलेल्या “सबका मालीक आत्मा” या संस्थेचे परम पूज्य जंगलीदास महाराज व त्यांचे शिष्य परमानंद महाराज यांनी घट कलशाचे पूजन करून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्याकडे घटकलश सुपूर्द केला.

कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी त्या घट कलशाचे मोठ्या भक्ती भावाने राज्यातील सर्वोच्च शिखरावर सालाबादप्रमाणे पहाटेच चढाई करून कळसुबाई मातेचा दुग्ध अभिषेक, आरती करून मंदिरात घटस्थापना केली. या स्तुत्य उपक्रमाची दरवर्षी सर्वत्र कौतुक होत असते.

या अगोदर बाबासाहेब पुरंदरे, राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार हेमंत गोडसे या मान्यवरांनी कळसुबाई मित्र मंडळाच्या कार्याची दखल घेत गिर्यारोहकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

या अनोख्या उपक्रमात कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, सोमनाथ भगत, निलेश पवार, प्रवीण भटाटे, काळू भोर, रमेश हेमके, नितीन भागवत, संजयमंत्री जाधव, उमेश दिवाकर, गणेश काळे, इंदिरा जाचक, सुमित्रा मराडे, रेखा भटाटे, डॉ. महेंद्र आडोळे, पुष्कर पवार, ज्ञानेश्वर मांडे, निलेश आंबेकर, बाळासाहेब आरोटे, चेतन जाधव, बाळू भोईर, सोनू भोर, तसेच मंडळाचे इतर बाळगोपालासह गिर्यारोहक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या