Saturday, April 26, 2025
Homeनगरघाटशिरसमधील विद्यार्थ्यांना पळवून नेण्याचा प्रयत्न

घाटशिरसमधील विद्यार्थ्यांना पळवून नेण्याचा प्रयत्न

पालक विद्यार्थ्यांमध्ये खळबळ

तिसगाव |वार्ताहर| Tisgav

तालुक्यातील घाटशिरस येथील चार शालेय विद्यार्थ्यांना पडोळे वस्तीवरील मराठी शाळेपासून अज्ञात व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून चॉकलेट देतो सांगून एका चार चाकीतून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावातीलच ज्येष्ठ ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हा संपूर्ण प्रकार फसला. या प्रकारामुळे घाटशिरससह परिसरामध्ये विद्यार्थी व पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

मढीकडून घाटशिरसमार्गे देवराईकडे चार चाकी वाहनातून जात असलेल्या अज्ञात व्यक्तींनी पडोळेवस्ती जवळील प्राथमिक शाळेजवळ सायकल खेळत असलेल्या चार विद्यार्थ्यांजवळ चार चाकी गाडी उभी करून चॉकलेट देत चाकूचा धाक दाखवत पळवून नेण्याचा प्रयत्न करत असतानाच जवळच काही अंतरावर उभ्या असलेल्या गावातील ज्येष्ठ व्यक्तीने या अज्ञात व्यक्तींकडे विचारपूस केली.

तसेच तुम्ही या मुलांना कुठे घेऊन निघाला आहात, अशी विचारणा करत परिसरातील आजूबाजूच्या ग्रामस्थांना देखील आरडाओरड करून घटनास्थळी बोलावले. लोक धावत पळत येत असल्याचे लक्षात येताच अज्ञात व्यक्तींनी या मुलांपासून चार चाकी वाहनांसह देवराईकडे पळ काढला. या प्रकारामुळे शालेय विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भितीचे वातारण पसरले आहे.

घाटशिरस येथील मुलांना चॉकलेटचे आमिष दाखवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना घडली आहे. या प्रकाराबाबत मुला-मुलींसह पालक व शिक्षकांनी जागृत राहण्याची गरज असल्याचे आवाहन सरपंच गणेश पालवे यांनी केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

भारताच्या

Pahalgam Terror Attack: भारताच्या हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानच्या कुरापती सुरुच; सलग दुसऱ्या...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi पहलगाम दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर भारताने उचललेल्‍या कडक पावलामुळे पाकिस्‍तानची झोप उडाली आहे. पाकिस्‍तानच्या सैन्याने सलग दुसऱ्या दिवशी शस्‍त्रसंधीचे उल्‍लंघन केले...