Thursday, August 20, 2026
HomeनगरNewasa : घोडेगावच्या अपर तहसीलदारपदाचा मान महिलेला

Newasa : घोडेगावच्या अपर तहसीलदारपदाचा मान महिलेला

माजलगावची शेतकरी कन्या सोनाली मात्रे यांची नियुक्ती

सोनई |वार्ताहर| Sonai

नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे शासनाने अपर तहसीलदार यांचे कार्यालय सुरु करण्याची घोषणा केल्यानंतर घोडेगावच्या पहिल्या तहसीलदारपदाचा मान एका महिलेला मिळाला आहे. परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी सोनाली मात्रे यांची अपर तहसीलदारपदी नियुक्ती झाली आहे.

- Advertisement -

जिल्हाधिकारी यांनी घोडेगाव अपर तालुका तहसीलदारपदी सोनाली अर्जुनराव मात्रे यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत. नेवासा तालुक्यातील घोडेगाव, वडाळा बहिरोबा, चांदा, सोनई व देडगाव या पाच महसूल मंडळे त्यांच्या कार्यक्षेत्रात असणार आहेत.

सोनाली मात्रे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा मे 2022 मध्ये दिली होती. मूळच्या बीड जिल्ह्यातील माजलगावच्या शेतकरी कुटूंबातील असलेल्या सोनाली मात्रे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात मुलींमध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या होत्या.

ताज्या बातम्या

Shirdi : अमेरिकेतील युद्धाच्या धोरणामुळेच डांबराची टंचाई

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धधोरणामुळे आणि पश्चिम आशियातील तणावामुळे डांबराची टंचाई निर्माण होऊन नगर-मनमाड महामार्गाचे काम संथगतीने सुरू असल्याच्या आपल्या...