Friday, June 13, 2025
Homeनगरयोग्य व्यवस्थापनामुळे घोडेगाव कांदा मार्केट देशभरात प्रसिद्ध - कृषीमंत्री दादाजी भुसे

योग्य व्यवस्थापनामुळे घोडेगाव कांदा मार्केट देशभरात प्रसिद्ध – कृषीमंत्री दादाजी भुसे

नेवासा | तालुका प्रतिनिधी | Newasa

- Advertisement -

राज्यात सर्वाधिक कांदा (Onion) आवक घोडेगाव (Ghodegoan) येथे होते आहे ही बाब नेवाश्याचा (Newasa) दृष्टीने अभिनंदनीय. योग्य व्यवस्थापनामुळे घोडेगाव कांदा मार्केट (Ghodegaon Onion Market) आज देशभरात प्रसिद्ध झाले आहे असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री दादांनी भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse) यांनी केले.

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समिती (Newasa Agricultural Produce Market Committee) नवीन विस्तारित 29 कांदा गळ्यांचा मंत्री शंकरराव गडाख (Minister Shankarrao Gadakh) यांच्या संकल्पनेतून बेरोजगार शेतकरी तरुणांना व्यापारी बनवणाऱ्या कांदा मार्केटचा सोमवार दि. 28 जुन 2021 रोजी कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते व नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्गदर्शक जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले. याप्रसंगी बोलतांना मंत्री दादाजी भुसे बोलत होते.

कष्ट कमी होऊन शेतकर्‍यांच्या उत्पादन वाढीवर संशोधन गरजेचे – कृषीमंत्री दादाजी भुसे

ना.भुसे पुढे म्हणाले की, शंकरराव गडाख हे नेहमी नेवासा तालुक्यासह नगर जिल्ह्यातील शेतकरी प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी व विविध शेतीपूरक योजना राबवण्यासाठी मला भेटत असतात. त्यांची सदैव त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची तयारी असते. घोडेगाव सारख्या ठिकाणी ना गडाख यांनी प्रयत्नपूर्वक सुरू केलेले कांदा मार्केट आज योग्य व्यवस्थापनामुळे देशभरात प्रसिद्ध झाले आहे. राज्यात सर्वाधिक कांदा आवक घोडेगाव येथे होते आहे ही बाब नेवाश्याचा दृष्टीने अभिनंदनीय अशी आहे. बेरोरजगार शेतकरी तरुणांना कांदा व्यापारी आडतदार करणारा उपक्रम कृषी क्षेत्रासाठी प्रेरणादायी व दिशादर्शक असा आहे यातून प्रेरणा घेऊन काम करू असेही भुसे म्हणाले. तसेच ना शंकरराव गडाख यांनी विविध सहकारी व कृषीपूरक संस्थाची काळजीपूर्वक जपवणूक करत बेरोजगार तरुणांना व्यवसाय उपलब्ध करून दिला त्याबद्दल ना गडाखांचे त्यांनी कौतूक केले तसेच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व महाविकास आघाडीचे संपुर्ण मंत्रिमंडळ नेहमी शेतकरी बांधवांच्या प्रगतीसाठी कटिबध्द आहे असेही भुसे म्हणाले.

राहाता बाजार समितीत 14842 गोणी कांदा आवक

याप्रसंगी मंत्री गडाख यांनीही उपस्थित कांदा आडतदार व व्यापारी यांचेशी संवाद साधत व्यवसायास शुभेच्छा दिल्या व यापुढे व्यवसाय करतांना काहीही अडचण आली तर मदतीसाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही ना.गडाख यांनी दिली.यावेळी सर्व कांदा आडतदार व्यापारी,शेतकरी उपस्थित होते. बाजार समितीचे सभापती डॉ.शिवाजीराव शिंदे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. सचिव देवदत्त पालवे यांनी आभार मानले.

शुभारंभ प्रसंगी मंत्र्यांनी केला कांद्याचा लिलाव…

घोडेगाव उपाआवारातील नवीन कांदा मार्केटमधील गळ्यांच्या शुभारंभ प्रसंगी कृषी मंत्री दादाजी भुसे व मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी कांद्याचा लिलाव केला लिलाव केलेल्या कांद्याला सर्वोच्च 2400 रुपये प्रति 100 किलो भाव मिळाला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

बेशिस्त

Nashik News: बेशिस्त पार्किंग, अनधिकृत गाड्या, विक्रेत्यांमुळे शहराचा चेहरा बकाल; आ....

0
नाशिक | प्रतिनिधी शहरातील द्वारका, मुंबई नाका तसेच इतर प्रमुख चौक व रस्त्यांवर दिवसेंदिवस वाढणाऱ्या अतिक्रमणामुळे नाशिक शहराचा चेहरा बकाल होत आहे. बेशिस्त पार्किंग, अनधिकृत...