Friday, November 22, 2024
Homeक्राईमघोडेगावच्या 6 दारु अड्ड्यांवर स्थानिक गुन्हा अन्वेषणचे छापे

घोडेगावच्या 6 दारु अड्ड्यांवर स्थानिक गुन्हा अन्वेषणचे छापे

सोनई |वार्ताहर| Sonai

घोडेगाव तालुका नेवासा येथे बुधवार दि. 16 रोजी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने विनापरवाना बेकायदा गावठी हातभट्टीची दारू विक्री होत असलेल्या सहा ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घोडेगाव परिसरात अवैध दारू विक्री होत असलेली गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना समजल्याने त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले .स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत पहिली फिर्याद स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक सोमनाथ आस्मानराव झांबरे यांनी दिली की घोडेगाव बाजारपेठेत मुंजोबा मंदिराच्या जवळच्या घराच्या आडोशाला दीपक काशिनाथ कुर्‍हाडे, रा. घोडेगाव याच्याकडे 4 हजार रुपये किमतीची 40 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू आढळून आली. दुसरी फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल विशाल अण्णासाहेब तनपुरे यांनी दिली की घोडेगाव बाजार तळाजवळ टपरीच्या आडोशाला दीपक रमेश कुर्‍हाडे याच्याकडे 5 हजार रुपये किमतीची 50 लिटर हातभट्टीची तयार दारू मिळून आली.

तिसरी फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल विशाल अण्णासाहेब तनपुरे यांनी दिली की घोडेगाव येथील एकलव्य नगर येथे संजय एकनाथ गायकवाड याच्याकडे 5 हजार रुपये किमतीचे 50 लिटर तयार दारू व 15 हजार रुपये किमतीची दारू तयार करण्यासाठी लागणारे 300 लिटर कच्चे रसायन असा एकूण 20 हजार रुपयांचा माल मिळुन आला. चौथी फिर्याद पोलीस नाईक संदीप संजय दरंदले यांनी दिली की घोडेगाव भिलहट्टी येथे सुधाकर मारुती कुर्‍हाडे याच्याकडे 6 हजार रुपये किमतीचे 60 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू व 20 हजार रुपये किमतीची दारू तयार करण्यासाठी लागणारे 400 लिटर कच्चे रसायन असा एकूण 26 हजार रुपये माल मिळून आला.

पाचवी फिर्याद पोलीस नाईक संदीप संजय दरंदले यांनी दिली की गोरख लक्ष्मण दहातोंडे याच्या घराच्या आडोशाला 10 हजार रुपये किमतीची 100 लिटर गावठी तयार दारू मिळून आली. सहावी फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल विशाल अण्णासाहेब तनपुरे यांनी दिली की, बाजार तळाजवळील सरकार चिकन शॉपचे टपरीच्या आडोशाला अश्फाक निसार शेख याच्याकडे 8 हजार रुपये किमतीची 80 लिटर तयार दारू मिळून आली आहे. 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेने या सर्व आरोपी विरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात 65(ई) प्रमाणे कारवाई केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या