Wednesday, May 22, 2024
Homeनगरघोडेगाव येथे आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

घोडेगाव येथे आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi

नेवासा (Newasa) तालुक्यातील घोडेगाव (Ghodegav) येथे 18 जुलै रोजी नगर-संभाजीनगर महामार्गालगत कॅनाल जवळ पुरुष जातीचा मृतदेह (Dead Body) मिळून आला आहे.

- Advertisement -

मयत इसमाचे वय 35 ते 40 वर्ष असून शरीर बांधा सडपातळ, डोक्यावर काळे लांब वाढलेले केस, दाढीचे काळे पांढरे वाढलेले केस, अंगात पिवळसर रंगाचा शर्ट, त्यावर पांढर्‍या रेषा, कंबरेला निळ्या पांढर्‍या रंगाची लुंगी गुंडाळलेली आहे. 18 रोजी सोनई पोलीस ठाण्याला खबर मिळाली.

सदर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आलेला आहे. तरी वरील व्यक्तीबद्दल कुणाला काही माहिती असल्यास त्यांनी सोनई पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सोनई पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्ता गावडे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या