Friday, August 21, 2026
HomeनगरNewasa : घोडेगावात फर्निचर दुकानाला आग; दीड कोटी रुपयांचे नुकसान

Newasa : घोडेगावात फर्निचर दुकानाला आग; दीड कोटी रुपयांचे नुकसान

सोनई |वार्ताहर| Sonai

अहिल्यानगर-संभाजीनगर महामार्गावरील घोडेगावातील तीन मजली माता घोडेश्वरी फर्निचर या दुकानाला 20 सप्टेंबरच्या रात्री 10:40 वाजता भीषण आग लागली. यात अंदाजे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घोडेगाव बसस्थानक जवळ सचिन व सुजित सुभाष चोरडिया यांचे फर्निचरचे भव्य शोरूम आहे. या शोरुमला दि. 20 रोजी रात्री 10:40 वाजता आग लागल्याचे लक्षात आले. त्यामुळे तत्काळ गावातील युवकांनी पुढाकार घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न केला, पण आग वाढतच असल्याने परिसरातील अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. सदर इमारत दोन्हीही बाजूने बंद असल्याने आग आटोक्यात येत नव्हती, आग लांबवर दिसत असल्याने भयानक चित्र दिसत होते.

- Advertisement -

अहिल्यानगर महानगरपालिका, ज्ञानेश्वर कारखाना, मुळा कारखाना, शनेश्वर देवस्थान ट्रस्ट, नेवासा नगरपंचायत, राहुरी नगरपरिषद या ठिकाणाहून अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आले होते. गुरुवारी पहाटे 6:30 वाजता आग आटोक्यात आली.आग शॉटसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. काऊंटर जवळ अगोदर आग लागली असल्याचे समजते. नंतर तीसर्‍या मजल्यापर्यंत ही आग पोहचली. या आगीत फ्रिज, कपाट, सोपा, टीव्ही, मिक्सर व भांडी जळून खाक झाले आहेत.

आग आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. आग लागल्याचे समजताच युवा नेते उदयन गडाख यांनी घटनास्थळी भेट दिली. घोडेगाव कामगार तलाठी कार्यालयाच्या वतीने दुपारी पंचनामा करण्याचे काम सुरू होते. सोनई पोलीस ठाण्याचे कर्मचारी, घोडेगाव, शनिशिंगणापुर व सोनई येथील ग्रामस्थ व मित्रमंडळीने आपापल्या परीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : आजी-माजी लोकप्रतिनिधींना जिल्हा बँकेत पुन्हा संधी!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महाराष्ट्रासह संपूर्ण आशिया खंडात नावलौकिक असलेल्या, तसेच नगर जिल्ह्यातील शेतकरी आणि साखर कारखानदारांची आर्थिक कामधेनू मानल्या जाणार्‍या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी...