नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल शनिवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी कांद्याच्या आवकेत वाढ झाली. भाव जास्तीत जास्त 2700 रुपयांपर्यंत निघाले. शनिवारी 40 हजार 665 गोण्या आवक झाली. उन्हाळ गावरान कांद्याच्या एक-दोन लॉटला 2500 ते 2700 रुपयांपर्यंत भाव मिळाला.
मोठा कलर पत्तीवाल्या कांद्याला 1900 ते 2250 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 1000 ते 1800 रुपये, गोल्टा कांद्याला 700 ते 1000 रुपये, गोल्टी कांद्याला 300 ते 700 रुपये, जोड कांद्याला 300 ते 400 रुपये तर हलक्या डॅमेज कांद्याला 200 ते 300 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. नविन लाल कांद्याची 6536 गोण्या आवक झाली.
एक-दोन लॉटला 2200 ते 2600 रुपये भाव मिळाला. मोठा कलर पत्तिवाल्या कांद्याला 2000 ते 2100 रुपये, मुक्कल भारी 1600 ते 1900 रुपये, गोल्टा 1200 ते 1500 रुपये तर गोल्टी कांद्याला 800 ते 1000 रुपये भाव मिळाला.