Saturday, May 4, 2024
Homeनगरघोगरगाव वीज सबस्टेशनला मंजुरी; ना.तनपुरे यांनी दिले आदेश

घोगरगाव वीज सबस्टेशनला मंजुरी; ना.तनपुरे यांनी दिले आदेश

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

नेवासा (Newasa) तालुक्यातील घोगरगाव (Ghogargav) येथील 33 के व्ही क्षमतेच्या सबस्टेशनच्या (Substation) कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पुढील 2 महिन्यात पूर्ण करून सदर कामाची सुरुवात झाल्यानंतर काम 1 वर्षात पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन ऊर्जा राज्यमंत्री ना प्राजक्त तनपुरे (Minister of State for Energy Prajakt Tanpure) यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिली.

- Advertisement -

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख (Minister of State for Soil and Water Conservation Shankarrao Gadakh) यांनी नेवासा (Newasa) तालुक्यातील विजेच्या अडीअडचणी संदर्भात बैठक आयोजित करण्याच्या सुचना दिल्यानंतर गुरूवार दि.9 सप्टेंबर 2021 रोजी मंत्रालयात ना शंकरराव गडाख (Minister of State for Soil and Water Conservation Shankarrao Gadakh) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी ऊर्जा राज्यमंत्री ना प्राजक्त तनपुरे (Minister of State for Energy Prajakt Tanpure), भालचंद्र खंडाईत प्रकल्प संचालक, राजुरकर प्रकल्प संचालक महापारेषण, भडिकर कार्यकारी संचालक, प्रवीण परदेशी अधीक्षक अभियंता इन्फ्रा, सुनील काकडे अधीक्षक अभियंता नगर, लक्ष्मण काकडे कार्यकारी अभियंता नगर तसेच बडे, चेचर, कुकडे आदी बैठकीस उपस्थित होते.

या कामाबरोबरच तालुक्यातील सोनई (Sonai) जवळील धनगरवाडी (Dhangarwadi) येथील 33 के व्ही क्षमतेचे सबस्टेशन मंजूर (Substation Approved) असून या कामासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध झाल्यानंतर या सबस्टेशनचे (Substation) कामही लवकरात लवकर हाती घेतले जाईल. त्याचबरोबर तालुक्यातील तामसवाडी (Tamaswadi), खुपटी (Khupti), रांजणगाव देवी (Ranjangav Devi), प्रवरासंगम (Pravara Sangam) या ठिकाणीही 31 के व्ही क्षमतेचे सबस्टेशन (Substation) प्रस्तावित आहे. या सबस्टेशनला (Substation) शासनस्तरावर निधीची उपलब्धता झाल्यानंतर हे काम हाती घेतले जाईल.

मात्र दरम्यानच्या काळात या सर्व ठिकाणच्या सबस्टेशनचा डी पी आर (Substation DPR) तयार करण्याच्या सुचना देण्यात आल्या. त्याचबरोबर माका (Maka), घोडेगाव (Ghodegav), चांदा (Chanda),बेलपिंपळगाव (Belpimpalgav) येथे सध्या अस्तित्वात असलेले उपककेंद्र सातत्याने ओव्हरलोडने चालत असून त्याचा मोठ्या प्रमाणावर त्रास शेतकऱ्यांना होत असल्याचे ना गडाख (Minister Shankarrao Gadakh) यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिल्यानंतर या उपकेंद्रांची क्षमतावाढ करण्याच्या सुचना बैठकीत संबधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

तसेच प्रवरासंगम व आसपासच्या गावातील शेतकऱ्यांनी बऱ्याच वर्षांपासूनची प्रवरासंगम येथे 33 के व्ही क्षमतेचे सबस्टेशन व्हावे अशी मागणी होती त्यावर बैठकीत चर्चा होऊन सदर ठिकाणचा तात्काळ सर्व्हे करण्यात येऊन प्रस्ताव संबधित विभागास सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

त्याचबरोबर तालुक्यातील काही ठिकाणी अद्यापही लोक सिंगलफेज योजनेच्या लाभापासून वंचित होते त्यांनाही या योजनेचा लाभ व्हावा यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यात सर्व ठिकाणचा सर्व्हे करण्यात येऊन ज्या सबस्टेशनमध्ये एस.डी.टी ट्रान्सफार्मर (SDT transformer in substation) बसावयाचे राहिले आहे. त्याठिकाणी ते बसविण्यात येतील यासाठी आवश्यक असलेल्या निधीची तरदुत ऊर्जा विभागाच्या मेंटन्स हेड मधून करण्यात येईल तसेच तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांची 2 ते 3 पोलवर नवीन वीज कनेक्शनची मागणी होती. त्यावर बैठकीत चर्चा झाली.मात्र महावीतरणकडे त्याबाबतीत कुठलेही धोरण नसल्याचे आधीकाऱ्यांनी सांगितले. त्यावर चर्चा होऊन शेतीपंपासाठी कृषी वीज धोरण 2020 अंतर्गत वीज कनेक्शन देण्याबाबतचे निर्देश देण्यात आले. या व इतर प्रश्नांवर चर्चा होऊन बैठक संपन्न झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या