Friday, June 21, 2024
Homeनाशिकघोटी पोलिसांकडून गावठी दारुचा अड्डा उध्द्वस्त; ४ लाख १० हजारांचे साहित्य नष्ट

घोटी पोलिसांकडून गावठी दारुचा अड्डा उध्द्वस्त; ४ लाख १० हजारांचे साहित्य नष्ट

घोटी | Ghoti

- Advertisement -

घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खैरगांव शिवारात गावठी दारू बनवली जात असल्याची गुप्त माहिती समजताच पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल धुमसे व त्यांच्या पोलीस पथकाने तालुक्यातील खैरगांव शिवारातील मोराच्या डोंगरातील वन विभागाच्या हद्दीतील भागात दोन ठीकाणी धाड मारून गावठी दारू अड्डा घोटी पोलीसांनी नष्ट केला.

या छाप्यात गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे ४ लाख १० हजार रूपयाचे गावठी दारुचे सडलेल रसायन व २४ हजार रुपयांचे साहित्य जागेवरच नष्ट केले. पोलीसांची चाहुल लागताच दारू बनवणाऱ्या इसमांनी थेट जंगलात पळ काढला. या छाप्यात २०० लिटरचे ३१ प्लॅस्टीकचे ड्रम व १० लोखंडी ड्रम, उग्र वासाचा गुळ, मिरची, नवसागर आदी मुद्देमाल जागेवरच नष्ट केला.

या ठिकाणी दारू बनवणाऱ्या अज्ञात आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपअधीक्षक सुमिल भामरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद पाटील पोलीस उपनिरीक्षक अनिल धुमसे, पोलीस कॉन्स्टेबल केशव बस्ते, मयूर सोनवणे, मिलिंद पवार, अनिकेत मोरे, होमगार्ड डहाळे, हांडे, महाले यांनी केली. घोटी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या