इगतपुरी | Igatpuri
तालुक्यातील खेड (Khed) येथे घोटी पोलसांनी (Ghoti Police) जुगार अड्ड्यावर छापा (A Raid on Gambling) टाकून तब्बल ४० जणांवर गुन्हा दाखल करत ११ दुचाकी वाहनांसह ५१ हजार ३०० रुपये रोख रक्कम आणि १९ मोबाईल जप्त केले आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अट्टल जुगाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
Nashik News : पहाटेच्या सुमारास घराला भीषण आग; एकाचा होरपळून मृत्यू, लाखोंचे नुकसान
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना खेड येथील मंदिराजवळ काहीज जण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी पोलिसांचे (Police) पथक तयार करून खेड येथील मंदिराजवळ रात्री ८.४५ वाजेच्या सुमारास छापा टाकला असता यात खेड, काणनवाडी, कावनई, इंदोरे,कोल्हार ता. राहुरी, वासाळी या ठिकाणाहून आलेल्या जुगारींना पकडण्यात यश आले.
Deshdoot Special : पालकमंत्र्यांचा ‘दम’ अन् पोलिसांची ‘दमछाक’; नाशिककरांना अशीच ‘पोलिसींग’ हवी
दरम्यान, या छाप्यात ४० जुगारींसह ११ दुचाकी वाहने, १९ मोबाईल व ५१ हजार ३०० इतकी रोख रक्कम असा एकूण ०७ लाख २ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना मिळून आला. या छाप्यावेळी पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, उपनिरीक्षक सुदर्शन आवारी, अनिल धुमसे,पोलीस नाईक श्रीकांत दोंदे, केशव बसते, गौरव सोनावणे, सतीश चव्हाण उपस्थित होते.
‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
Nashik Yeola Crime News : येवल्यात तीन ठिकाणी दरोडा, अनेकांना मारहाण करत लुटले लाखो रुपये