Monday, November 25, 2024
Homeमनोरंजनजगातील सर्वात सुंदर महिला 'जीना लोलोब्रिगिडा' यांचे निधन

जगातील सर्वात सुंदर महिला ‘जीना लोलोब्रिगिडा’ यांचे निधन

दिल्ली | Delhi

‘जगातील सर्वात सुंदर स्त्री’ (Most Beautiful Woman In The World) असा नावलौकीक कमावलेली आणि हॉलिवूडच्या सुवर्ण युगातील (Golden Age of Hollywood) शेवटचे प्रतिक मानल्या गेलेल्या अभिनेत्री जीना लोलोब्रिगिडा ( Gina Lollobrigida) यांचं निधन झाले आहे. त्या ९५ वर्षाच्या होत्या. त्यांच्या निधनाने हॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. अनेक कलाकार त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करताना दिसत आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये जीना लोलोब्रिगिडा यांच्या मांडीजवळील हाडाला दुखापत झाली होती. त्यांच्या मांडीचे हाड तुटले होते. त्यानंतर सप्टेंबरमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर जीना लोलोब्रिगिडा या अगदी ठणठणीत झाल्या होत्या. त्या चालत-फिरतही होत्या. पण अचानक त्यांच्या निधनाचे वृत्त समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

“मी पूर्ण कपड्यांत फिरते, बाकीच्यांचे…”; उर्फी जावेद प्रकरणी शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत

एक काळ असा होता जेव्हा जीना लोलोब्रिगिडा प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होत्या. आजही त्यांच्या सिनेमांच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगतात. जीना लोलोब्रिगिडा यांचा जन्म ४ जुलै १९२७ साली एका फर्निचर कारागिरीच्या घरात झाला. जीना लोलोब्रिगिडा यांचं तरुणपण युद्धाकाळात गेलं. जीना लोलोब्रिगिडा यांच्या कुटुंबातील कोणीही अभिनय क्षेत्रात नव्हतं. पण जीना लोलोब्रिगिडा यांनी एक अभिनेत्री म्हणून स्वतःच्या करियरची सुरुवात केली. जीना लोलोब्रिगिडा यांनी त्यांच्या करियरची सुरुवात मॉडलिंगपासून केली.

दुसऱ्या विश्व युद्धानंतर जेव्हा इटलीमध्ये सिनेमे साकारण्यात सुरुवात झाली, तेव्हा जीना लोलोब्रिगिडा तुफान चर्चेत आल्या. अभिनय क्षेत्रात जेव्हा जीना लोलोब्रिगिडा यांना अपयशाचा सामना करावा लागला तेव्हा त्यांनी आपल्या करियरची दिशा बदलली. अभिनेत्री आणि सुंदर महिला म्हणून लोकप्रियता मिळवण्यानंतर जीना लोलोब्रिगिडा यांनी जर्नलिस्ट म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. या क्षेत्रात देखील जीना लोलोब्रिगिडा यांना यश मिळालं.

…अन् सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला पेट, भर कार्यक्रमातच घटना; नेमकं काय घडलं?

जीना लोलोब्रिगिडा यांनी ‘ब्लॅक ईगल’, ‘कम सप्टेंबर’, ‘ट्रेपीज’, ‘अलार्म बेल्स’, ‘बीट द डेविल’, ‘बुओना सेरा’ आणि ‘मॅड अबाउट ओपेरा’ या चित्रपटांमध्ये काम केले. १९५३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्रेड, लव्ह अँड ड्रिम्स या चित्रपटामुळे जीना यांना विशेष लोकप्रियता मिळाली. १९५६ मध्ये प्रदर्शित झालेल्या The Hunchback of Notre Dame या चित्रपटामध्ये देखील त्यांनी काम केलं. १९५३ मध्ये प्रदर्शित झालेल्या Beat the Devil या चित्रपटामध्ये देखील त्यांनी प्रमुख भूमिका साकारली.

१९६९ मध्ये जीना यांनी ‘डेविड डी डोनाटेलो अवॉर्ड’ जिंकला होता. १९५५ मध्ये प्रदर्शित झालेल्या La Donna Piu Bella del Mondo या चित्रपटामुळे त्यांना ‘जगातील सर्वात सुंदर महिला’ अशी ओळख मिळाली. जीना यांनी काही काळ फोटो जर्नलिस्ट म्हणून देखील काम केलं होतं. १९६१ मध्ये जीना लोलोब्रिगिडा यांना गोल्डन ग्लोब पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. त्यांना तीन वेळा गोल्डन ग्लोब पुरस्कारसाठी नॉमिनेट करण्यात आलं होतं. फाल्कन क्रेस्ट, द लव्ह बोट, वुमन ऑफ रोम या मालिकामध्ये देखील जीना यांनी काम केले.

VIDEO : सलाम तुमच्या शौर्याला! गर्भवतीसाठी जवान बनले ‘देवदूत’

जीना लोलोब्रिगिडाचे टोपणनाव ‘लोलो’ होते. त्यांना सर्वजण याच नावाने हाक मारायचे. विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरने जीना लोलोब्रिगिडा यांच्या नावावरुन प्रभावित होत स्वत:ला लोला असे टोपणनाव दिले.

२०१७ मध्ये जीना यांच्या एका वक्तव्याने मोठी खळबळ माजली होती. त्यांच्यावर दोन वेळा लैंगिक अत्याचार झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं. वयाच्या १९व्या वर्षी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाला होता. पण दुसऱ्या वेळी त्या कलाविश्वात असताना त्यांच्यासोबत हा प्रकार घडला होता, पण त्यांनी याविरोधात आवाज उठवण्याची हिम्मत केली नव्हती, असंही त्यांनी कबूल केलं.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या