Saturday, May 25, 2024
Homeमुख्य बातम्याकविता राऊत, दत्तू भोकनळ यांसारख्या खेळाडूंना...; भुजबळांच्या लक्षवेधी सूचनेवर महाजनांचे उत्तर

कविता राऊत, दत्तू भोकनळ यांसारख्या खेळाडूंना…; भुजबळांच्या लक्षवेधी सूचनेवर महाजनांचे उत्तर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आंतरराष्ट्रीय स्पर्धांत देशाच नावलौकिक उंचावणाऱ्या आपल्या खेळाडूंना सरकारी नोकरीमध्ये घेतलं जातं नाही. अत्यंत कष्टाने व जिद्दीने हे खेळाडू देशासाठी पदक मिळवतात, पण आपण त्यांचा योग्य तो सन्मान करू शकत नाही, ही खेदजनक बाब आहे. त्यामुळे फक्त समित्या नेमून वेळकाढूपणा करण्यापेक्षा याबाबत ठोस व ताबडतोब निर्णय घ्यावा, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे केली…

- Advertisement -

त्यावरील उत्तरात कविता राऊत, दत्तू भोकनळ व अंजना ठमके या खेळाडूंना नवीन क्रीडा धोरणाची अंमलबजावणी करून वर्ग १ पदी तात्काळ नोकरीत सामावून घेतले जाईल अशी माहिती राज्याचे क्रीडा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिली.

यावेळी लक्षवेधी सूचना मांडताना छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकचे आंतरराष्ट्रीय खेळाडू कविता राऊत, दत्तू भोकनळ व अंजना ठमके या खेळाडूंनी जगभरात देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. या खेळाडूंचा महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्कारने सन्मान देखील केला आहे. क्रीडा क्षेत्रातील सर्वत्कृष्ट भारत सरकारचा अर्जुन पुरस्कार सुद्धा सन २०२० मध्ये दत्तू भोकनळ यांना प्राप्त झालेला असल्याचे सांगितले.

IND vs AUS 3rd Test : इंदोर कसोटीत भारताचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलिया WTC फायनलमध्ये

राज्य शासनाने शासन निर्णय दि. ३० एप्रिल, २००५ नुसार आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर दि. १ मे,२०११ च्या शासन निर्णयानुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली तर शासन सेवेत थेट नियुक्तीची मानके देखील निश्चित केलेली आहेत. या शासन निर्णयातील वर्ग १ पदासाठी आवश्यक असलेले निकष या तीन्ही खेळाडूंनी पूर्ण केलेले असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रासह देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजविणारे बहुतांश खेळाडूंना नोकरीची प्रतीक्षा कायम आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरील पदक प्राप्त खेळाडूंना थेट ‘वर्ग ‘अ’ नियुक्ती देण्याचा शासन आदेश असूनही त्याकडे प्रशासकीय उदासीनता दिसून येत आहे. खेळासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावल्यानंतरही खेळाडूंची शासन दरबारी उपेक्षाच सुरू आहे.

संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी आदित्य ठाकरे, संजय राऊत यांची चौकशी करा; मनसेच्या नेत्याच्या मागणीने खळबळ

वयोमर्यादा संपल्यानंतर अर्थात म्हतारे झाल्यांनंतर शासकीय नोकरी मिळणार का ? असा टाहो पात्र खेळाडूंकडून केला जात आहे. वारंवार चांगली कामगिरी करूनही, तसेच राष्ट्रीय राज्यस्तरीय मानाचे पुरस्कार प्राप्त करूनही असंख्य खेळाडू शासकीय नोकऱ्यांपासून वंचित आहेत. त्यामुळे फक्त समित्या नेमून वेळकाढूपणा करण्यापेक्षा याबाबत ठोस व ताबडतोब निर्णय घ्यावा अशी मागणी छगन भुजबळ यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे केली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

इंग्लंडच्या महिला क्रिकेटरने गर्लफ्रेंडशी केला साखरपुडा; कधीकाळी विराट कोहलीला केलं होतं प्रपोज

यावरील उत्तरात क्रीडा मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, सन २०१८ पासून शासनाने नवीन क्रीडा धोरण आणले आहे. या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत असून याबाबत अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे. त्यामुळे नवीन क्रीडा धोरणाची अंमलबजावणी करून पात्र असलेल्या कविता राऊत आणि दत्तू भोकनळ यांना वर्ग १ पदी तात्काळ नोकरीत सामावून घेतले जाईल अशी माहिती त्यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या