मुंबई | Mumbai
भाजपने (BJP) महाराष्ट्रात २०२४ साली होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी महाविजय २०२४ हे अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत पक्षाच्या सर्व आमदार व खासदारांचा प्रशिक्षण वर्ग भिवंडी येथे पार पडत आहे.
आज भिवंडीतील साया ग्रँड क्लब येथे पार पडत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यशाळेला पक्षाचे सर्व आमदार-खासदार उपस्थित आहेत. या कार्यशाळेत आलेले तीन आमदार लिफ्टमध्ये अडकले होते. यावेळी भाजप नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे आमदारांच्या मदतीला धावून आले…
मंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ; सिल्लोड न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश
प्रवीण दरेकर, मंदा म्हात्रे, श्वेता महाले हे आमदार लिफ्टमध्ये अडकल्याचे समजताच गिरीश महाजन यांनी लिफ्टचा दरवाजा वाकवत आमदारांना बाहेर काढले.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...
Rain Update : पुढील तीन ते चार तासात राज्यातील ‘या’ भागांत मुसळधार पावसाची शक्यता; नाशिकचं काय?