Friday, February 6, 2026
Homeनगरपाचव्या मजल्यावरून पडून बालिकेचा मृत्यू

पाचव्या मजल्यावरून पडून बालिकेचा मृत्यू

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सावेडी (Savedi) उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौकातील नियर विल्डींग सेंटरच्या पाचव्या मजल्यावरून पडून (Falling) चार वर्षीय बालिकेचा मृत्यू (Girl Death) झाला. शिवानी शिवाजी वाघमारे (रा. एमआयडीसी, अहिल्यानगर) असे मयत बालिकेचे नाव आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

बुधवारी (16 ऑक्टोबर) सकाळी शिवानी वाघमारे ही प्रोफेसर कॉलनी चौकातील नियर विल्डींग सेंटरच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडली. तिला उपचारासाठी येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी शिवानीची तपासणी केली असता तीचा मृत्यू (Death) झाला असल्याचे त्यांनी सांगितले. तशी माहिती डॉक्टरांनी तोफखाना पोलिसांना (Topkhana Police) दिली. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस अंमलदार देविदास आव्हाड करत आहेत.

YouTube video player

ताज्या बातम्या

Ahilyanagar : फळप्रक्रिया उद्योगासाठी राहुरीच्या कृषी विद्यापीठाची 1 हजार 500 एकर...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar फळ प्रक्रिया उद्योगासाठी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडील 1 हजार 500 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. हा उद्योग जिल्ह्यातील फळ उत्पादकांसाठी...