Monday, June 24, 2024
Homeक्राईमNashik News : आईचे छत्र हरपल्याने तरुणीची आत्महत्या

Nashik News : आईचे छत्र हरपल्याने तरुणीची आत्महत्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

आईचे छत्र हरपल्याने काकूकडे राहणाऱ्या अठरा वर्षीय तरुणीने (Girl) विष पिऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. तिच्या आत्महत्येचे कारण कळले नसून म्हसरुळ पोलीस (Mhasrul Police) आकस्मिक मृत्यूच्या नोंदीनुसार तपास करत आहेत.

हे देखील वाचा : Nashik Crime News : सेवानिवृत्तास गुंतवणुक करण्यास भाग पाडून १७ लाख रुपये उकळले

याबाबत अधिक माहिती अशी की, पूजा कानोजी मानवतकर (रा. विश्वचंद्र अपार्टमेंट, हरिहरनगर, दिंडोरी रोड, म्हसरुळ) असे मृत मुलीचे नाव आहे. तिने (दि.८) रोजी घरी असतांना काहीतरी कारणातून विषारी औषध (Poisonous) प्राशन केले. घटना लक्षात येताच तिला नातलगांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असतांना तिचा (दि. १०) रोजी मृत्यू झाला. त्यानंतर माहिती कळताच म्हसरुळ पोलीस ठाण्याचे हवालदार विजय गोसावी दाखल झाले. यानंतर त्यांनी पंचनामा करुन माहिती घेत नोंद केली.

हे देखील वाचा : Nashik Crime News : ‘त्या’ युवकाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या

दरम्यान, मृत पूजा ही काही महिन्यांपासून परभणी (Parbhani) येथील मूळगावाहून नाशिकमधील काकूकडे वास्तव्यास होती. तिचे वडील कानोजी व भाऊ हे खासगी वाॅचमन म्हणूण काम करतात. तिच्या आईचे निधन झाले असून ती सध्या शिक्षण न घेता घरीच काम करत होती. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. तपास गोसावी करत आहेत.

हे देखील वाचा : Nashik Crime News : बिल्डरपुत्रास जीवे मारण्याची धमकी; सराईताने मागितली ‘इतक्या’ लाखांची खंडणी

विवाहित तरुणाने संपविले जीवन

एक वर्षांपूर्वी विवाह झालेल्या २२ वर्षीय व्यक्तिने घरात गळफास घेऊन जीवन संपविले. करण नाना कटारे (रा. विजयनगर, दे. कँम्प) असे मृताचे नाव आहे. पोलीसांच्या माहितीनुसार, करण याने (दि. १०) सकाळी काहीतरी कारणातून गळफास घेतला. घटनेनंतर आईने त्याला कँन्टाेन्मेंट रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, तपासून मृत घोषित करण्यात आले. याबाबत दे. कॅम्प पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हवालदार राजेश मिरजे तपास करत आहेत.

हे देखील वाचा : Nashik News : माजी आयपीएस सासऱ्याला सुनेची धमकी; मागितली वीस लाखांची खंडणी

- Advertisment -

ताज्या बातम्या