Wednesday, March 26, 2025
Homeजळगावआयशर ट्रकने चिमुरडीला चिरडले ; देवगाव येथील घटना

आयशर ट्रकने चिमुरडीला चिरडले ; देवगाव येथील घटना

पारोळा – parola

तालुक्यातील देवगाव येथे एका सहा वर्षीय बालिकेला आयशर ट्रकने चिरडल्याने तिच्या जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दि.8 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.

- Advertisement -

याबाबत देवगाव तालुका पारोळा येथील पूजा अनिल भिल (वय 6) ही रस्त्याने जात असतांना आयशर ट्रक एम एच 04- एच. एस. 47 21 चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. लागलीच त्याठीकाणी जमाव जमून चालकाला बेदम मारहाण करून आईसर गाडीची तोडफोड करून चालकास ताब्यात द्या नाहीतर ट्रक पेटवून टाकू असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता यावेळी त्या ठिकाणी वातावरण जबरदस्त तापले होते.

पारोळा पोलीस निरीक्षक सुनील पवार उपनिरीक्षक राजू जाधव, जयवंत पाटील, अमर वसावे,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील पवार महेश पाटील बापू पारधी सुधीर चौधरी प्रवीण पाटील आशिष गायकवाड राहुल कोळी गोपाल पाटील प्रकाश गवळी महादू पाटील प्रशांत पगारे भाऊसाहेब मिस्तरी,अभिजीत पाटील किशोर भोई हेमचंद्र सावे राहुल पाटील विनोद साडी राठोड पोलीस पाटील जितेंद्र पाटील तुकाराम पाटील अशोक पाटील विश्वास पाटील यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जमावाला समजाविण्याच्या प्रयत्न केला मात्र जमाव ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हता त्यामुळे अंमळनेर येथील दंगा काबू पथक पाचारण करण्यात आले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आले सदर सहा वर्षीय पूजा या मालिकेचे शव रुग्णवाहिका चालक ईश्वर ठाकूर व यश ठाकूर यांनी पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 99 ग्रामपंचायतींची आज अंतिम मतदार यादी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्‍या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे, तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका...