Saturday, June 15, 2024
Homeनगरमुलीचा विनयभंग करत फोटो व्हायरल करण्याची धमकी

मुलीचा विनयभंग करत फोटो व्हायरल करण्याची धमकी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

लग्न केले नाही तर इन्स्टाग्रामवर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा तरूणाने विनयभंग केला. ही घटना शहरातील एका महाविद्यालय परिसरात घडली. याबाबत 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने पोलिसांत फिर्याद दिली आहे. तिच्या फिर्यादीवरून गौरव भिंगारदिवे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलगी बारावीत सायन्स विभागात शिक्षण घेत आहे. दि. 24 रोजी दुपारी 4 वाजता ती महाविद्यालयाच्या बगीच्याच्या बाहेर उभी असताना एक वर्षापूर्वी ओळख झालेला भिंगारदिवे हा तिथे आला. तुला माझ्यासोबत बोलायचे नाही का? असे तो म्हणाला. त्यास नकार दिल्याने तो म्हणाला की, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे. तु जर मला नकार दिला तर आपण दोघांनी सोबत काढलेले फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल करील, अशी धमकी देत हात पकडून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या