Wednesday, January 15, 2025
Homeक्राईमयुवतीला त्रास देणार्‍या राहुरी, श्रीरामपूरच्या तिघांवर गुन्हा

युवतीला त्रास देणार्‍या राहुरी, श्रीरामपूरच्या तिघांवर गुन्हा

पीडिताची कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद

अहिल्यानगर |प्रतिनिधी|Ahilyanagar

युवतीला वारंवार फोन करून तिच्याशी जवळीक साधून शारिरीक संबंध ठेवण्याची मागणी करणार्‍या तरुणासह त्याला या कामी मदत करणार्‍या पती- पत्नीविरोधात येथील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर शहरात राहणार्‍या पीडित युवतीने फिर्याद दिली आहे. रोहिदास तुपे (पूर्ण नाव नाही, रा. मातुलठाण, ता. श्रीरामपूर), हर्षदा तुपे (रा. वळणपिंप्री, ता. राहुरी) व अभिषेक कानडे (रा. वळणपिंप्री ता. राहुरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. हर्षदा व अभिषेक हे पती- पत्नी असून त्यांनी फिर्यादी युवतीची रोहिदास सोबत ओळख करून दिली होती. तेव्हापासून तो फिर्यादीला वारंवार फोन करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला.

- Advertisement -

रोहिदास हा फिर्यादीला वारंवार फोन व व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून जवळीक साधून शारिरीक संबंध ठेवण्याची मागणी करत होता. तिने याबाबत हर्षदा व अभिषेक यांना सांगितले असता त्यांनी देखील रोहिदास सोबत शारिरीक संबंध घडून यावे यासाठी वारंवार फोन करून फिर्यादीला मदत करण्याऐवजी रोहिदासला फिर्यादीला त्रास देण्याबाबत प्रेरित केले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे फिर्यादी वागली नाही म्हणून तिला शिवीगाळ करून दमदाटी केली. त्यांच्या त्रासाला कंटाळून पीडिताने बुधवारी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास महिला पोलीस अंमलदार अडसरे करत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या