Saturday, April 26, 2025
Homeमुख्य बातम्यागिरणा गौरव पुरस्कार जाहीर

गिरणा गौरव पुरस्कार जाहीर

नाशिक।प्रतिनिधी

गिरणा गौरव प्रतिष्ठान(Girna Gaurav Pratishthan ) तर्फे रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त देण्यात येणारा 25 वा ‘गिरणा गौरव पुरस्कार'( Girna Gaurav Puraskar) जाहीर करण्यात आले असून, यंदाच्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे.,चित्रपट दिग्दर्शक मंगेश हडवळ, पिंपरी चिंचवडचेमहानगरपालिकेचे आयुक्त, राजेश पाटील, संगीत दिग्दर्शक कौशल इनामदार, यांच्यासह अकरा जणांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

- Advertisement -

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

कालिदास कला मंदिरात येत्या पाच एप्रिल रोजी मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती गिरणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी दिली .निवड समितीच्या बैठकीत या पुरस्काराच्या नावाची घोषणा करण्यात आली. मानपत्र ,स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे पुरस्काराचे हे 25 वे वर्ष असून यात प्रामुख्याने सामाजिक, साहित्य ,शैक्षणिक सहकार, कला, संगीत, आदी क्षेत्रात भरीव योगदान देणार्‍या महाराष्ट्रातील नामवंतांना हा उतर महाराष्ट्राचा मानाचा स्तंभ म्हणून ओळखला जाणारा पुरस्कार देऊन गौरविण्यात येतो.

यंदा या पुरस्कारासाठी ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर रवींद्र कोल्हे (अमरावती) यांच्या सामाजिक योगदानाबद्दल विशेष सन्मान करण्यात येणार आहे.तर चित्रपट दिग्दर्शक मंगेश हाडवळ (पुणे) संगीतकार कौशल इनामदार (मुंबई ) राजेश पाटील आयुक्त पिंपरी चिंचवड मनपा (पुणे) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागाचे नाशिक अध्यक्ष व मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे (नाशिक), अहिराणी भाषा समृद्ध करणारे गायक व गीतकार सचिन कुमावत (जळगाव) साने गुरुजी एज्युकेशन संस्थेचे प्रवीण जोशी (नाशिक)नाशिक कवी चे अध्यक्ष व साहित्यक इंजि. बाळासाहेब मगर(नाशिक) शिवाजी दहिते पाटील (धुळे) ज्येष्ठ साहित्यिक विजयकुमार मिठे ( दिंडोरी), महिलांसाठी योगदान देणार्‍या स्वाती भामरे ( नाशिक) शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणारे प्राचार्य डॉ. सुभाष भालेराव( येवला ) लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षा सुवर्णा जगताप यांचा पुरस्कारार्थी मध्ये समावेश आहे.

प्रकाश होळकर, दिलीप पाटील, राजेंद्र निकम ,शंकर बोराडे, रवींद्र मालूंजकर, शिवाजी जाधव,प्रल्हाद ठाकरे, संजय फतनानी या समितीने पुरस्कार्थीची निवड केली

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...