Saturday, July 27, 2024
Homeनाशिकवृक्ष संवर्धनास महत्व द्या - कृषीमंत्री दादा भुसे

वृक्ष संवर्धनास महत्व द्या – कृषीमंत्री दादा भुसे

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

वृक्षारोपणाचे चांगले काम एस फाऊंडेशनसह ( S Foundation )विविध संस्थांतर्फे उभे राहत आहे. मात्र आपण किती झाले लावली यापेक्षा किती झाडे जगवली याला महत्व दिल्यास खर्‍या अर्थाने वृक्षारोपणाचा उद्देश ( The purpose of the plantation ) सफल होईल, असे प्रतिपादन कृषीमंत्री दादा भुसे ( Agriculture Minister Dada Bhuse ) यांनी येथे बोलतांना केले.

- Advertisement -

येथील एस फाऊंडेशनमार्फत ज्येष्ठ गुरूजनांचा सत्कार सोहळा तसेच वृक्षारोपण पंधरवडानिमित्त येथील पंचायत समितीच्या आवारात कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

एस फाऊंडेशनच्या माध्यमातून करोनाच्या संकट काळात नागरिकांच्या प्रबोधनासाठी पथनाट्याच्या माध्यमातून व्यापक स्वरुपात जनजागृतीचे महत्वपूर्ण काम झाल्याचे स्पष्ट करीत ना. भुसे पुढे म्हणाले, ऑक्सिजनचे महत्व करोनामुळे अधोरेखीत झाले असून तालुक्यातील सर्व शाळा परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्व पटवून देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमास पंचायत समिती सभापती सुवर्णा देसाई, विजयबापू देसाई, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, प्राचार्य विश्वनाथ शिंदे, संजय दुसाने, कृषि अधिकारी किरण शिंदे, गटशिक्षणाधिकारी तानाजी घोंगडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या