Monday, September 28, 2026
Homeदेश विदेशएक अब्ज डॉलर आणि देशातील एक सुंदर तरुणी लग्नासाठी द्यावी; 'या' देशाच्या...

एक अब्ज डॉलर आणि देशातील एक सुंदर तरुणी लग्नासाठी द्यावी; ‘या’ देशाच्या लष्करप्रमुखाची तुक्रीयेकडे अजब मागणी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
युगांडाचे लष्करप्रमुख आणि राष्ट्राध्यक्षांचे पुत्र, मुहूझी कैनेरुगाबा यांनी तुर्कियेला दिलेल्या एका अजब धमकीची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा होताना दिसत आहे. तुर्कीने आपल्याला सुमारे एक अब्ज डॉलर (अंदाजे नऊ हजार कोटी रुपये) आणि लग्नासाठी देशातील एक सुंदर तरुणी द्यावी, जर या मागण्यांची ३० दिवसांच्या आत पूर्तता झाली नाही तर तुर्कियेसोबतचे राजनैतिक संबंध तोडण्याची आणि तुर्की एअरलाइन्सवर बंदी घालण्याची धमकी त्यांनी दिली. कैनेरुगाबा यांनी ‘एक्स’वर लिहिले की, जर तुर्कियेने त्यांचे प्रश्न सोडवले नाहीत, तर ३० दिवसांच्या आत संबंध तोडले जातील. त्यांच्या या धमकीची सर्वत्र चर्चा होत आहे.

केनेरुगाबा याने ११ एप्रिल रोजी एक्सवर अनेक पोस्ट केल्या आहेत. त्यात त्याने लिहिले की, युगांडा हा गेल्या २० वर्षांपासून सोमालियामधील अल शबाब या दहशतवादी संघटनेशी लढत आहे. ही संघटना अल कायदाशी संबंधित आहे. या संघटनेविरोधात लढण्यासाठी युगांडाने सैन्य तैनात केले असून, त्यातील अनेक सैनिकांनी प्राण गमावले आहेत.

- Advertisement -

Cabinet Meeting: मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका; MPSC भरती प्रक्रियेत बदल, आशा भोसले संगीत अकॅडमी स्थापनेचा निर्णय

कैनेरुगाबा यांनी सोशल मीडियावर अनेक वादग्रस्त पोस्ट केल्या आहेत. त्याने विरोधी पक्षनेते बोबी वाईन यांचा शिरच्छेद करण्याची धमकी दिली, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. तथापि, नंतर त्याने ती एक गंमत असल्याचे सांगून माफी मागितली. दरम्यान, कैनेरुगाबाने काही दिवसांपूर्वी त्यांचे ‘X’ नावाचे खाते हटवले. त्यानंतर त्यांनी ‘मी परत आलो आहे’ अशी पोस्ट करून आपल्या परत येण्याची घोषणा केली आणि जगाला हादरवून टाकण्याची शपथ घेतली. परतल्यानंतर, लष्करी गणवेशात दिसणाऱ्या कोणालाही तत्काळ अटक करण्याचे आदेश सुरक्षा यंत्रणांना दिले. एका अमेरिकन राजदूताला सॅल्यूट न केल्यास अटक करण्याची धमकी दिली.

50 वर्षीय कैनेरुगाबाला वडील आणि राष्ट्राध्यक्ष योवेरी मुसेवेनी यांचा संभाव्य उत्तराधिकारी मानले जाते, जरी मुसेवेनी यांनी हे नाकारले असले तरी. तथापि, अनेक राजकीय विश्लेषकांचा असा विश्वास आहे की तो हळूहळू राजकारणात स्वतःला स्थापित करत आहे आणि भविष्यात अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवू शकतो.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...