Saturday, July 27, 2024
Homeनाशिकइगतपूरीला सर्व रेल्वे गाड्यांना थांबा द्यावा; केंद्रीय मंत्री दानवे यांना साकडे

इगतपूरीला सर्व रेल्वे गाड्यांना थांबा द्यावा; केंद्रीय मंत्री दानवे यांना साकडे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

इगतपुरी रेल्वे स्थानकावर (Igatpuri Railway Station) सर्व गाड्यांना थांबा (stop) मिळावा तसेच रेल्वे तिकीट (Railway ticket) व आरक्षण (reservation) मिळावे

- Advertisement -

अशी मागणीप्रवाशी संघटनेच्या वतीने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve, Minister of State for Central Railway) याच्याकडे करण्यात आली. नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील प्रवाशी संगटनेच्या सदस्यांच्या शिष्टमंडळाने रावसाहेब दानवेंंची भेट घेऊन त्यांना निवेदन (memorandum) दिले.

मुंबईहून जाणार्‍या बहुतांशी गाड्या या इगतपुरी (igatpuri) मार्गे जात असतात. त्यामुळे त्या भागातील चाकरमान्यांना मुंबईला (mumbai) जाणे व येणे सोयीचे व्हावे यासाठी इगतपुरी स्थानकावर सर्व गाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी किरण फलटणकर, भाजपा युवा मोर्चा नाशिक उपजिल्हाध्यक्ष योगेश चांदवडकर, इगतपुरी तालुका युवा मोर्चा संघटन सरचिटणीस भाऊसाहेब धोंगडे, इगतपुरी शहर युवा मोर्चा अध्यक्ष अभिजित जाधव, उपाध्यक्ष रोहन दगडे उपस्थित होते. रावसाहेब दानवे यांनी निवेदनातील मुद्दे वाचल्यावर इगतपुरीकरांसाठी कोणत्या गाड्यांना थांबा महत्त्वाचा आहे.

अशा गाड्यांची यादी सादर करण्याची सूचना केली. तसेच इगतपुरी मध्येरेल्वेची मुबलक जागा पडिक असुन तिथे रेल्वेचा कोणता प्रकल्प आणता येईल का? ज्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न सुटेल त्यासाठीचे पर्याय शोधण्यासाठी पुन्हा सविस्तर माहीी संकलीत करुन भेटण्यासाठी निमंत्रण दिले आहे. या माध्यमातून नवीन प्रकल्पावर काम करणे शक्य होणार असल्याचे सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या