नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड (AUS vs NED) यांच्यात वर्ल्ड कपमधील 24 वा सामना दिल्लीच्या अरूण जेठली स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याने वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वात जलद शतक ठोकले आहे.
मॅक्सवेलने 40 बॉलमध्ये शतक झळकावले. यात त्याने 9 चौकार तर 6 षटकारदेखील खेचले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 399 धावांचा डोंगर उभारला. आता नेदरलँडसमोर 400 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने दिले आहे.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्कराम याने 49 बॉलमध्ये आयसीसी क्रिकेट विश्वचषकमधील सर्वात जलद शतक झळकावले होते. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मार्करमने ही कामगिरी केली होती.
विशेष म्हणजे दिल्लीच्या मैदानातच मार्करमने शतक झळकावले होते. त्यानंतर आता याच मैदानात मॅक्सवेलने रेकॉर्ड मोडला आहे. भारताकडून विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 52 बॉलमध्ये शतक झळकावले होते.