Friday, July 12, 2024
Homeनगरगोदावरी पट्टयात वादळी वार्‍यासह परतीच्या पाऊस

गोदावरी पट्टयात वादळी वार्‍यासह परतीच्या पाऊस

नाऊर |वार्ताहर| Naur

- Advertisement -

श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी पट्ट्यातील नाऊर, रामपुर, नायगांव, सराला गोवर्धन, उंदिरगाव, माळेवाडी भागात वादळी वार्‍यासह विजेच्या कडकडात जोरदार पावसाने बॅटिंग केल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने कपाशी, सोयाबीन, मका, कांदयाचे रोप आदी पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक पीके जोरदार वादळामुळे भुईसपाट झाले आहेत. या सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करून शासनाने मोबदला देण्याची मागणी आता शेतकर्‍यांकडून होत आहे.

मालवाहू टेम्पोची अज्ञात वाहनास धडक, एक ठार

आज (सोमवार दि. 10) रोजी दुपारी 3 च्या सुमारास सुरू झालेल्या वादळी वार्‍यासह परतीच्या पावसाने तब्बल दोन तास गोदावरी पट्ट्यात मोठा धुव्वादार बँटिग करत अनेक शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये कपाशी सोयाबीन कांद्याचे रोपे हे पूर्णतः जलमय झाले असून कपाशीचे बोंडे फुटण्याच्या तयारीत असतांना खाली माना टाकल्या आहेत. तर कांदयाचे रोपे देखील पाण्याखाली गेली आहे.

पक्षावर बंदी घालणे हा निर्णय अभूतपूर्व – जयंत पाटील

या भागातील शेतकरी वेळोवेळी झालेल्या पावसामुळे सुखावला होता. मात्र नुकत्याच झालेल्या या पावसामुळे शेतकरी धास्तावला आहे. पिकांचे सरसकट पंचनामे तसेच मदतीची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

दहा महिन्यांत 14 गुरूजी निलंबित शिक्षक

- Advertisment -

ताज्या बातम्या