Saturday, July 27, 2024
Homeनगरगोदावरीच्या अपुर्‍या अवर्तनामुळे गणेश परिसरातील उभी पिके धोक्यात

गोदावरीच्या अपुर्‍या अवर्तनामुळे गणेश परिसरातील उभी पिके धोक्यात

पूर्व भागात फळबागांनाही पुरेसे पाणी नाही - शेळके

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

जलसंपदा विभागाने गोदावरीच्या उजव्या कालव्यावरील उभे उसाचे पिके, चारा पिके यांना पाणी न दिल्याने ही पिके धोक्यात आहेत. फळबागांनाही अर्धवट पाणी दिल्याची तक्रार गणेश कारखान्याचे वाकडी येथील संचालक विष्णुपंत शेळके व गोंडेगाव येथील संचालक अरविंद फोपसे यांनी केली आहे. तीव्र उन्हाळा, पाणी टंचाईचे सावट अशा अवस्थेत उन्हाळी आवर्तनातील पाणी उभ्या पिकांना मिळेल या आशेने शेतकरी वर्गाने सात क्रमांकाचे पाणी मागणी अर्ज भरुन दिले. विशेष म्हणजे पाणी मिळणार असल्याने शेतकर्‍यांनी बाक्याही भरल्या. परंतू वैजापूर, गंगापूर तालुक्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी गोदावरी कालव्यांचे पाणी सोडले. त्यामुळे गोदावरी दोन्ही कालव्यांचे चालू उन्हाळी आवर्तन अडचणीत आले. यामुळे शेतकरी वर्ग हवालदील झाले. मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना करणारे शेतकरी आपली कर्ज काढून उभी केलेली पिके हातची जाणार म्हणून चिंतेत आहेत.

- Advertisement -

खरे तर जलसंपदा विभागाने जलद कालव्याचे त्यांना देय असलेल्या पाण्याचे नियोजन करायला हवे. उन्हाळ्यात त्यांचेच पाणी पिण्यासाठी राखीव ठेवणे गरजेचे होते. या चुकीच्या व्यवस्थापनाचा फटका गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्राला बसला आहे. सध्या गोदावरी कालव्याच्या टेल भागातील गोंडेगाव, वाकडी, चितळी परिसरात निव्वळ फळबागांना पाणी दिले असले तरी अर्धवट प्रमाणात दिले असल्याचे श्री. शेळके व फोपसे यांनी सांगितले. गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी दोन आंदोलने केली. अधिकार्‍यांनी आश्वासने दिली. मात्र ती पाळली नाहीत. मागणी प्रमाणे पाणी दिले नाही,असे ही शेळके व फोपसे यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या