Thursday, January 8, 2026
Homeनगरगोदावरी कालव्यात पडून मुलाचा बुडून मृत्यू

गोदावरी कालव्यात पडून मुलाचा बुडून मृत्यू

नांदुर्खी |वार्ताहर| Nandurkhi

शिर्डी (Shirdi) साकुरी शिवाला राहत असलेल्या शैलेश देविदास सोळसे या तरुण मुलाचा गोदावरी कालव्यात (Godavari Canal) पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू (Drown Death) झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शैलेश 20 मे 2024 दुपारी 3 वाजता गोदावरी कालव्यात पोहण्यासाठी आला. त्याने कालव्यात पोहण्यासाठी उडी घेतली असता तो पाण्यातून वरच आला नाही. त्याचे आई, वडील, भाऊ नातेवाईक यांनी सगळीकडे शोधाशोध केली. त्याचा कुठेच तपास लागला नाही.

- Advertisement -

दुसर्‍या दिवशी सकाळी गोदावरी कालव्याच्या (Godavari Canal) पाण्यात कपडे धुण्यासाठी महिला गेल्या असता त्यांना लोखंडी खांबाला पाण्यात सदर मुलाचा मृतदेह दिसून आला. त्यानंतर हा मृतदेह (Dead Body) कोणाचा अशी चर्चा झाल्याने शैलेशच्या आई वडिलांनाही या घटनेची माहिती मिळाली. शैलेशचे आई वडील घटनास्थळी येऊन हा मुलगा आपलाच असल्याचे सांगून या मुलाचा आम्ही कालपासून शोध घेत असल्याचे सांगून घटनास्थळी रडून आक्रोश केला. या घटनेची माहिती पोलिस पाटील सोमनाथ वाणी यांना देण्यात आली. त्यांनी शिर्डी पोलिसांना (Shirdi Police) माहिती दिली.

YouTube video player

शिर्डी पोलिसांनी सदर घटनेचा गुन्हा नोंदविला असून सदर घटनेमागील काय कारण आहे याचा ते शोध घेत आहे. शैलेशच्या पश्चात वडील, आई, दोन बहिणी, भाऊ असा परिवार आहे. शैलेश मनमिळाऊ, हुशार असल्याने परिसरात त्याच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या