Friday, March 28, 2025
Homeनगरअखेर गोदावरीच्या दोन्ही कालव्यांना पाणी सुटले

अखेर गोदावरीच्या दोन्ही कालव्यांना पाणी सुटले

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

अखेर गोदावरीच्या दोन्ही कालव्याला काल रविवारी 6 वाजता नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून पाणी सोडण्यात आले.
धरणांमधून 6 व 7 मे रोजी पाणी सोडण्यात आले होते. चार दिवस पाणी धरण ते नांदूरमधमेश्वर बंधारा या अंतराला लागले. तीव्र उन्हाळ्यामुळे वहन व्ययही मोठ्या प्रमाणात झाला. धरणातून सोडलेले पाणी बंधार्‍या पर्यंत पोहचण्यास एक टिएमसी पाण्याचा वापर झाला होता. हे पाणी नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात 9 मे ला पोहचल्यानंतर डेड स्टॉक मध्ये पाणीसाठा असल्याने नांदूरमधमेश्वर बंधार्‍याची लेव्हल येण्यास चार दिवस लागले.

- Advertisement -

काल सायंकाळी 6 वाजता 32.30 फुट लेव्हल आल्यानंतर राहाता भागात वाहणारा उजवा कालवा सोडण्यात आला आहे. या कालव्यातून सुरुवातीला 250 क्युसेकने विसर्ग करणे सुरू झाले. आज सोमवारी हा विसर्ग वाढवत तो 500 ते 550 क्युसेक इतका करण्यात येणार आहे. या बंधार्‍याची लेव्हल 33 फुट असल्यानंतर बंधार्‍यातुन कालव्यांना विसर्ग करण्यात येत असतो. गोदावरीचा कोपरगावच्या दिशेने वाहाणार्‍या उजव्या कालव्याला सुरुवातीला 100 क्युसेकने पाणी सोडण्यात आले. हे पाणी वाढवत आज सकाळी पूर्ण क्षमतेने सोडले जाईल.

तीव्र उन्हाळ्यामुळे गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात तीव्र पाणी टंचाई व उभी बारमाही पिके सुकून गेली होती. या सोडलेल्या आवर्तनामुळे या पिकांना दिलासा मिळणार आहे. नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून सोडलेले पाणी बुंधवारी दि. 15 रोजी रात्री उशीरा अथवा गुरुवारी दि. 16 रोजी सकाळी राहाता, अस्तगाव परिसरात दाखल होऊ शकेल, असा अंदाज आहे. या आवर्तनात सुरुवातीला पिण्याच्या पाण्यासाठी पाणी देण्यात येणार आहे. त्यानंतर उभ्या फळबागा, ऊस पिकांना पाणी देण्यात येणार आहे. साधरणत: तीन टिएमसी पाण्याचा वापर या आवर्तनात होणार आहे.

5 ते 6 जूनपर्यंत हे आवर्तन सुरु राहील. जुलै अखेरपर्यंत पिण्याचे पाणी पुरले पाहिजे. असे या आवर्तनाचे नियोजन आहे. धरणातील पाणी साठे पाहता हे शेवटचे आवर्तन असणार आहे. जलसंपदाचे सर्व अधिकारी कर्मचारी निवडणूक कामी सहभागी झाले आहेत. 14 मे रोजी पुन्हा हे अधिकारी कर्मचारी कालव्यांच्या आवर्तनाच्या नियोजनासाठी दाखल होणार आहेत. आवर्तनासाठी सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या गांधीनगर जवळील विजय ममता चित्रपटगृहाजवळ ट्रॅक्टरची वाहतूक करणाऱ्या ट्रकची एका तरुणाला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक युवक...