Friday, November 22, 2024
Homeनगरगोदावरीचा पूर ओसरला; जायकवाडीचा उपयुक्तसाठा 23 टक्क्यांवर

गोदावरीचा पूर ओसरला; जायकवाडीचा उपयुक्तसाठा 23 टक्क्यांवर

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

धरणांच्या पाणलोटातील पाऊस थांबल्याने धरणांचे विसर्ग कमी करण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरीतील पूर ओसरला आहे. काल सायंकाळी नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून 7044 क्युसेकने विसर्ग गोदावरीत जायकवाडीच्या दिशेन सोडण्यात येत होता. जायकवाडी जलाशयात काल मंगळवारी सायंकाळी 6 वाजता 30 हजार क्युसेकने पाण्याची आवक गोदावरी- प्रवरातून दाखल होत होती. काल सायंकाळी जायकवाडीतील उपयुक्तसाठा 23 टक्क्यांवर पोहचला होता.

- Advertisement -

काल सायंकाळी 6 च्या आकडेवारी नुसार नाशिक जिल्ह्यातील दारणातुन 3391 क्युसेकने, भावलीतुन 290 क्युसेकने, भाम मधुन 1120 क्युसेक, वालदेवीतून 183 क्युसेक, गंगापूर मधून 1500 क्युसेक, भोजापूर मधून 539 क्युसेक असा विसर्ग करण्यात येत होता. कडवा व पालखेड मधील विसर्ग बंद करण्यात आले आहे. तर गोदावरी कालवे गोदावरीतील जास्त विसर्गामुळे टांगले होते ते काल सुरु झाले. वरील धरणांमधुन विसर्ग घटत गेल्याने काल दिवसभरात नांदूरमधमेश्वर मधून जायाकवाडीकडे गोदावरीत सोडण्यात येणारा विसर्ग 7044 क्युसेकवर आणण्यात आला आहे. काल सकाळी 6 वाजेपर्यंत 1 जून पासुन चा एकूण विसर्ग गोदावरीत 14.1 टिएमसी या बंधार्‍यातून झाला आहे.

खाली गोदावरी व प्रवरातुन जायकवाडी जलाशयात काल सायंकाळी 6 वाजता 30 हजार क्युसेकने आवक सुरु होती. जायकवाडीचा उपयुक्तसाठा 17.60 टीएमसी इतका झाला आहे. तर उपयुक्तसह मृतसाठा 43.6 टीएमसी इतका झाला होता. या धरणात उपयुक्तसाठा 22.96 टक्के इतका झाला होता. नगर तसेच नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या नजरा जायकवाडीच्या जलाशयाकडे लागल्या आहेत. या धरणात किती साठा होतो? अजुन किती पाणी जायला हवे, यावरच चर्चा सुरु आहे.

याबाबत जलसंपदाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ सार्वमतशी बोलतांना म्हणाले, मेंढेगिरी अहवाला प्रमाणे समन्यायी पाणी वाटपाच्या पर्याय क्रमांक 1 प्रमाणे जायकवाडीत जिवंत पाणी साठा 37 टक्के असेल तेंव्हा नगर, नाशिक भागातील जिवंतसाठा मुळा समुहा 49 टक्के, भंडारदरा समुह 56 टक्के, गंगापूर समुह 61 टक्के, दारणा समुह 64 टक्के, पालखेड समुह 73 टक्के असायला पाहिजे. परंतु जायकवाडीचा जिवंत साठा अद्याप 37 टक्के म्हणजे 28 टीएमसी झालेला नाही. तो काल 17.60 टीएमसी म्हणजेच 22.96 टक्के इतका झाला आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये जायकवाडी 41.49 टीएमसी म्हणजे 54 टक्के पाहिजे. पर्याय क्रमांक 3 नुसार जायकवाडी मध्ये 49.80 टीएमसी म्हणजेच 65 टक्के पाहिजे. हा पर्याय जायकवाडीत तसेच नगर-नाशिक जिल्ह्यातील खरीपात झालेला पाणी वापर हिशेबात घेवून अंमलात आणला जातो, असेही श्री. निर्मळ म्हणाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या