Thursday, July 9, 2026
HomeनगरRahata : गोदावरी नदीला पूर 55778 क्युसेकने विसर्ग

Rahata : गोदावरी नदीला पूर 55778 क्युसेकने विसर्ग

3 दिवसात दारणा निम्मे, गंगापूर 68 टक्क्यांवर

राहाता | Rahata

नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसाने दारणा तिसर्‍या दिवशी काल सायंकाळी 6 वाजता निम्मे भरले. गंगापूर 67.88 टक्के, भावली 81.66 टक्के भरले. अन्य धरणांच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे. दरम्यान नाशिक, सायखेडा, चांदोरी तसेच नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पूर्व भागातील मुसळधार पावसाचे पाणी गोदावरीत दाखल होत असल्याने नांदूर मधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरी जायकवाडीच्या दिशेने काल सायंकाळी सहा वाजता 55 हजार 778 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता.

- Advertisement -

दरम्यान, गोदावरीचे पात्र भरून वाहत असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. गोदाकाठच्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या 3 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात मुसळधार पाऊस पडत आहे. घाटमाथ्यावरील पाणी धरणांच्या साठ्यात दाखल होत आहे. सोमवारी धरणाचा साठा 7.18 टक्के होता. तो तिसर्‍या दिवशी काल बुधवारी सायंकाळी 6 वाजता 49.49 टक्के इतका झाला. काल सकाळी 6 वाजता संपलेल्या मागील 24 तासांत दारणाच्या भिंतीजवळ 107 मिमी पावसाची नोंद झाली.

इगतपुरीला 205 मिमी (8 इंच), घोटीला 118 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे दारणाच्या पाणीसाठ्यात 1 टीएमसीहून अधिक पाण्याची आवक झाली. भावलीला 186 मिमी पाऊस झाला. भावलीत 234 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. भाम धरण परिसरात 124 मिमी पाऊस झाला. भाम मध्ये 347 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. वाकी 99 मिमी पावसाची नोंद झाली. या धरणात 121 दलघफू पाणी दाखल झाले. मुकणे 89 मिमी पावसाची नोंद झाली. मुकणे धरणात 295 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. काल दुपारपर्यंत या धरणांच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्या मुळे दारणा 50 टक्के भरले आहे. (7149 क्षमतेच्या या धरणात 3538 दलघफू पाणी), भाम प्रकल्पात 41.49 टक्के, भावलीत 81.67 टक्के पाणी साठा झाला आहे.

गंगापूर धरणाच्या पाणलोटातही पावसाची मुसळधार होती. काल सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासात 101 मिमी पावसाची नोंद झाली. काल सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत या धरणाच्या भिंतीजवळ 83 मिमी पावसाची नोंद झाली. 12 तासात गंगापूर मध्ये 819 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. गंगापूर 67.88 टक्के भरले आहे. गंगापूर धरण समूहातील कश्यपीला 126 मिमी पाऊस सकाळपर्यंत झाला. काल दिवसभरात 81 मिमी पावसाची नोंद झाली. दिवसभरात 120 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. हे धरण 47.40 टक्के भरले आहे. गौतमी गोदावरीला 121 मिमी पावसाची नोंद सकाळी 6 पर्यंत झाली. काल दिवसभरात 109 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. गौतमी गोदावरी 84.76 टक्के भरले आहे. या धरणातून गंगापूरच्या दिशेने 2208 क्यूसेकने विसर्ग सोडण्यात येत आहे.

गोदावरी नदीवरील नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याची आवक होत आहे. या बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत काल सकाळी 6 वाजता 6310 क्यूसेकने विसर्ग सुरू होता. पाण्याची आवक वाढत असल्याने विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात आली. सकाळी 9 वाजता 12620 क्यूसेक, 11 वाजता 15248 क्यूसेक, दुपारी एक वाजता 18403 क्यूसेक, 3 वाजता 40133 क्यूसेक, 4 वाजता 53223 क्यूसेक तर सायंकाळी 6 वाजता 55778 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू होता. यासाठी या बंधार्‍याचे सर्व 8 वक्राकार गेट उघडण्यात आले आहे. पाणी वेगाने जायकवाडीच्या दिशेने वाहत आहे. नदी विसर्ग वाढल्याने गोदावरीला पूर आला आहे.

गोदावरीत सोडण्यात आलेले पाणी काल सायंकाळी 4 वाजता नागमठाण (वैजापूर) सरिता मापन केंद्राजवळ 360 क्यूसेकने विसर्ग मिळत होता. तासाभरात 5 वाजता तो 1800 क्यूसेकवर गेला. तासाने 6 वाजता 2750 क्यूसेकने मिळाला. रात्री उशिरा जायकवाडी जलाशयात जास्तीचा विसर्ग दाखल होईल. काल सायंकाळी 6 वाजता 28.69 टक्के उपयुक्तसाठा जलाशयात होता.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरा धरण 65 टक्के भरले; निळवंडेत ‘एवढा’ पाणीसाठा

0
अतिवृष्टीमुळे भातरोपे, बांधांचे प्रचंड नुकसान, पंचनाम्याची मागणी भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara उत्तर नगर जिल्ह्याची भाग्यरेखा असलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात पुनर्वसु नक्षत्रांच्या सरींचे तांडव केल्याने धरणात वेगाने नवीन...