Tuesday, June 17, 2025
Homeनगरगोदावरीत 36731 क्युसेकने विसर्ग

गोदावरीत 36731 क्युसेकने विसर्ग

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

सह्यद्रिच्या घाटमाथ्यावर पावसाचे जोरदार आगमन होत असल्याने दारणा, गंगापूर धरणांमध्ये पाण्याची आवक होत आहे. दारणातून 10202 क्युसेक, गंगापूर धरणातून 1514 क्युसेक, तसेच अन्य धरणातूनही विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीत नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून 36731 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. खाली जायकवाडीतूनही विसर्ग वाढविण्यात आला आहे. काल सायंकाळी 6 वाजता 28896 क्युसेक ने विसर्ग करण्यात येत होता.

- Advertisement -

दोन दिवसांपासुन धरणांच्या पाणलोटात जोरदार पावसाचे आगमन होत आहे. तांत्रिक दृष्ट्या ही धरणे भरली आहेत. त्यामुळे नविन दाखल होणार्‍या पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. काल दिवसभरात मध्यम ते जोरदार पावसाचे आगमन दिवभर होत होते. काल सकाळी 6 ते सायंकाळी 5 पर्यंत गंगापूर ला 29 मिमी, कश्यपीला 36 मिमी, गौतमीला 42 मिमी, त्र्यंबकला 48 मिमी, अंबोलीला 60 मिमी पावसाची नोंद झाली. तर दारणा च्या पाणलोटातील दारणाला 18 मिमी, मुकणे 50 मिमी, भावली 67 मिमी, असा पाऊस काल दिवसभरात नोंदला गेला.

पाण्याची आवक वाढल्याने दारणातून 5588 क्युसेकने सुरु असलेला दारणातील विसर्ग काल सायंकाळी 10202 क्युसेक ने सुरु होता. मुकणेतून 1520 क्युसेक, कडवातून 2250 क्युसेक, वालदेवीतून 183 क्युसेक, गंगापूर मधुन 1514 क्युसेक, भोजापूर मधुन 190 क्युसेक, पालखेड मधुन 17366 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. गंगापूरचा विसर्ग वाढणार असून तो 1514 क्युसेक वरुन 3000 क्युसेक सकाळ पर्यंत वाढू शकतो.

हे सर्व विसर्ग तसेच निफाड तालुक्यातील पावसाचे पाणी नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दाखल होत असल्याने गोदावरीतील विसर्ग 36731 क्युसेक वर नेण्यात आला आहे. काल सकाळी 6 वाजता हा विसर्ग 14420 क्युसेक इतका सुरू होता. तो वाढवत काल सायंकाळी 36731 क्युसेक इतका करण्यात आला. या विसर्गात वाढ होण्याची शक्यता असल्याने गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

खाली जायकवाडीत काल रात्री 8 वाजता जायकवाडी जलाशयात 28894 क्युसेकने नविन पाण्याची आवक होत होती. या धरणात 95.16 टक्के पाणीसाठा आहे. काल रात्री 8 वाजता या धरणातून दिड फुट उचललेल्या 10 ते 27 क्रमांकाच्या 18 दरवाज्यातून 28296 क्युसेक तर उजव्या कालव्यातून 600 क्युसेक असे 28896 क्युसेक ने विसर्ग करण्यात येत होता. या धरणात नाशिक च्या धरणांचे व नगर च्या भंडारदरा, निळवंडे धरणातून 16718 क्युसेक ने विसर्ग प्रवरा नदीत सोडण्यात येत होता. त्यामुळे हे पाणीही जायकवाडी जलाशयात दाखल होणार असल्याने जायकवाडीतच्या विसर्गात वाढ होवु शकते. जायकवाडीत उपयुक्तसाठा 72.95 टिएमसी इतका तर उपयुक्तसह एकूण साठा 90 टिएमसी इतका आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

चीफ

मोठी बातमी! इस्राईलचा इराणला आणखी एक दणका; चीफ ऑफ आर्मी स्टाफ...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi इस्राइल आणि इराण यांच्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या संघर्षात दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यात इस्राइलने इराणमधील...